Sunday horoscope today Saam TV Marathi
राशिभविष्य

Sunday Horoscope: या 5 राशींवर होणार धनवर्षाव! नोकरी-व्यवसायात मिळणार मोठी संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya : 12 राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष : मेहनत आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचा दिवस आहे. कामात अपेक्षित यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा आणि महत्त्वाची कामे रखडवून ठेवू नका. आर्थिक व्यवहारात सावध राहा. उधारीचे व्यवहार टाळणे चांगले ठरेल.

वृषभ : आर्थिक संधींचा योग्य फायदा घेण्याची संधी मिळेल. कामाचा वेग वाढेल आणि करिअर - व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवता येईल. आरोग्य आणि मनोबलही चांगले राहील.

मिथुन : कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आदर केल्याने नात्यांमध्ये जवळीक वाढेल. घर, वाहन किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांना गती मिळू शकते. मित्र आणि प्रियजनांचे सहकार्य मिळेल; मात्र वाद टाळून आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून कामात चांगल्या संधी मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगती होईल आणि व्यवसायातही चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.

सिंह : कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे सुरळीत होतील. व्यवसायात सातत्य राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

कन्या : नवीन कल्पना आणि नावीन्यपूर्ण कामांसाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात चांगली कामगिरी होईल आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात; प्रेमसंबंधात जवळीक आणि विश्वास वाढेल.

तूळ : व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक सावध राहण्याची गरज आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका.

वृश्चिक : आर्थिक संधींचा फायदा घेण्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना पुढे जातील आणि आकर्षक प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मित्र आणि हितचिंतकांचे सहकार्य मिळाल्याने मनोबल उंचावेल.

धनु : वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव मिळू शकतात तसेच रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहनाशी संबंधित कामे मार्गी लागतील; प्रेमसंबंध आणि आरोग्यही चांगले राहील.

मकर : नशिबाची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल आणि करिअर-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून प्रेमसंबंधात विश्वास आणि सकारात्मकता वाढेल.

कुंभ : आरोग्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या. कामात संयम ठेवा आणि आर्थिक व्यवहारात कोणतीही घाई किंवा निष्काळजीपणा करू नका.

मीन : कामकाजाच्या बाबतीत दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील आणि आर्थिक लाभ अपेक्षेपेक्षा चांगला होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

भीमाशंकरमध्ये गर्दी व्यवस्थापनाचा फज्जा! एका बाजूला ट्रॅफिक जाम, दुसरीकडे पोलिस-भाविकांमध्ये हाणामारी

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दीत धावणार १५ डब्यांच्या लोकल, कर्जत-खोपोली, कसारा, बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा

1 रुपयात अनलिमिटेड कॉल, रोज १ जीबी डेटा, १०० SMS; पण ही एक अट...BSNL ची जबरदस्त ऑफर

फार्म हाऊसवर सुरू होता भयंकर प्रकार; पोलिसांची धाड पडताच पळापळ, ८ महिलांसह २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT