Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात अरिशफा खान आणि आम्रपाली दुबे यांच्यात जोरदार वाद झाला. संस्कारांवरून सुरू झालेले वाद इतके वाढले की अन्य स्पर्धकांना मध्यस्थी करावी लागली.
Bigg Boss 20
Bigg Boss 20Saam Tv
Published On

Bigg Boss 20: सलमान खानचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा नवा सीझन सुरू होऊन अवघा एक आठवडा झाला आहे. मात्र, शोच्या घरात सदस्यांमधील वाद आणि मतभेदांना सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अरिशफा खान आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांच्यात खटके उडताना दिसत आहेत. आता शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला असून, यामध्ये दोघींमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे.

आम्रपाली आणि अरिशफामध्ये जोरदार वाद

‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आम्रपाली दुबे आणि अरिशफा खान यांच्यातील वाद पाहायला मिळतो. सिंकजवळ आम्रपाली तोंड धूत असताना त्यांच्या वादाला सुरुवात होते. आम्रपाली अरिशफाला सांगते की, घरातील अनेक सदस्य तिच्याशी आणि उदितीशी बोलण्यास घाबरतात. कारण त्या दोघी कधी आणि कोणत्या गोष्टीवरून नाराज होतील, याचा अंदाज येत नाही. यावर अरिशफा स्वतःचा बचाव करत म्हणते की, तिच्याशी कोणीही घाबरत नाही आणि आम्रपाली सोडली तर घरातील इतर सदस्य तिच्याशी बोलतात. त्यानंतर दोघींमधील वाद आणखी वाढतो.

Bigg Boss 20
Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

‘माझ्या संस्कारांवर बोलू नकोस’

आम्रपाली अरिशफाला म्हणते की, ती छोट्या-छोट्या गोष्टींवर लगेच नाराज होते आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करते. आम्रपालीच्या या वक्तव्यामुळे अरिशफा संतापते. “जर तुला माझे संस्कार आवडत नसतील, तर माझ्याशी बोलू नकोस,” असे अरिशफा तिला सुनावते. यानंतर दोघींमध्ये जोरदार भांडणं रंगते. आम्रपाली म्हणते की, समोरची व्यक्तीही माणूसच आहे. त्यावर अरिशफा आपण आम्रपालीकडे माफी मागण्यासाठी आले असल्याचे सांगते. मात्र, आम्रपाली तिला “येण्याची तसदी घेऊ नकोस,” असे सुनावते. वाद वाढत गेल्यानंतर घरातील इतर सदस्यांना दोघींमध्ये मध्यस्थी करावी लागते. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

Bigg Boss 20
Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

काझी तौकीरसहही आम्रपालीचा वाद

दरम्यान, अरिशफासोबतच्या वादापूर्वी आम्रपाली दुबे आणि काझी तौकीर यांच्यातही टास्कदरम्यान बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर आम्रपालीने काझीला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे शोच्या पहिल्याच आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये मोठे मतभेद निर्माण होताना दिसत आहेत. आता अरिशफा आणि आम्रपाली यांच्यातील हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com