राशिभविष्य

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Diwali Padwa 2025 Lucky Zodiacs: दिवाळीतील सर्वात महत्त्वाच्या आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस लक्ष्मीची कृपा आणि नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

आज २२ ऑक्टोबर २०२५ बुधवारचा दिवस आहे. आजचा दिवस हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच पाडव्याचा दिवस आहे. हा दिवस दिवाळीनंतरचा पहिला दिवस असून वर्षातील अत्यंत शुभ आणि मंगल तिथींपैकी एक मानला जातो. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं पूजन केलं जातं. तसंच अनेक ठिकाणी आज गोवर्धन पूजा आणि बळीप्रतिपदा साजरी केली जाते.

पाडव्याच्या दिवशी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते आणि व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याप्रमाणे घरात आनंद, समाधान आणि ऐश्वर्याची वाढ होते. लक्ष्मी कृपेमुळे आजचा दिवस काही राशींसाठी विशेष लाभदायक असणार आहे.

आजचं पंचांग

  • वार: बुधवार

  • तिथी: शुक्ल प्रतिपदा

  • नक्षत्र: स्वाति

  • करण: बव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: प्रीति

  • ऋतु: शरद

  • सूर्योदय: सकाळी ६:२०

  • सूर्यास्त: संध्याकाळी ५:४३

  • चंद्रोदय: सकाळी ६:५३

  • चंद्रास्त: संध्याकाळी ५:५९

  • चंद्रराशी: तुला

  • शक संवत्: १९४७

  • विक्रम संवत्: २०८२

  • हिंदू महिना: कार्तिक

शुभ व अशुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: दुपारी ११:३९ ते १२:२३

  • राहुकाल: दुपारी १२:०१ ते १:२६

  • गुलिकाल: सकाळी १०:३६ ते १२:०१

  • यमघंट: सकाळी ७:४५ ते ९:१०

पाडव्याचं आणि गोवर्धन पूजेचं महत्त्व

पाडवा म्हणजे दिवाळीचा चौथा दिवस जो नव्या वर्षाची सुरुवात आणि सौख्याचा प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी विष्णू-लक्ष्मी पूजन, गोवर्धन पर्वताची पूजा आणि बलिप्रतिपदा उत्सव साजरा केला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा अभिमान मोडला होता. त्यामुळे आजचा दिवस प्रकृती पूजन आणि संरक्षण यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दाम्पत्य एकमेकांप्रती स्नेह आणि सन्मान व्यक्त करतात. घरात लक्ष्मीचा वास राहावा, यासाठी संध्याकाळी दिवे, फुलं आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.

मिथुन (Gemini)

आज तुमच्यासाठी संधी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. कामात गती येण्याची शक्यता आहे. जुन्या योजनांना नवं रूप मिळू शकणार आहे. आर्थिक लाभ आणि कौटुंबिक आनंद वाढणार आहे.

सिंह (Leo)

सिंह राशीसाठी हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. कामात यश, वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. घरात सणासुदीचं वातावरण अधिक आनंदी होणार आहे.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रेरणादायी असणार आहे. आध्यात्मिकतेकडे ओढ निर्माण होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांती नांदणार आहे. आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं पायांमध्ये दिसतात; 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई करावी विजय कुंभार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Indian Student News : दिवाळी साजरी करताना धाडकन खाली कोसळला, दुबईत १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Bull Attack : दुचाकींचा पाठलाग करत मोकाट बैलाचा हल्ला; हल्ल्यात लहान मुलगा जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

वारंवार अन्न योग्यरित्या पचत नसेल तर काय करावं?

SCROLL FOR NEXT