horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : मनस्ताप वाढणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Thursday Horoscope In Marathi : आज काही राशींच्या लोकांचा मनस्ताप वाढणार आहे. तर काहींच्या हातून चुका घडण्याची शक्यता आहे. वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,१८ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,द्वादशी श्राध्द,संन्यासिनां महालय,गुरुपुष्यामृत.

तिथी-द्वादशी २३|२५

रास- कर्क

नक्षत्र-पुष्य

योग-शिव

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज गुरुपुष्यामृत योग आहे. घरामध्ये नव्याने खरेदी करणारा असाल तर दिवस चांगला आहे. सुवर्ण खरेदी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे पुढे जावे. दिवस आनंदी आहे.

वृषभ - व्यवसायामध्ये भाग्यकारक घटना घडतील. करिअरमध्ये अडचणी आल्या तरी नेटाने पुढे जाल. भावंड सौख्य उत्तम आहे. विशेषतः बहिणीच्या प्रेमाने सुखावून जाल.

मिथुन - सोने खरेदी आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस आपल्या राशीला उत्तम आहे. आज गुरुपुष्यामृत योग, आजच्या योगावर केलेली सुवर्ण खरेदी ही भरभराटीची ठरते. धनाची आवक जावक चांगली राहील.

कर्क - काही नव्या गोष्टी आणि ध्येय मनात घेऊन आजचा दिवस प्रगतीपथावर नेणार आहे. स्वतःच्या आनंदासाठी करण्यात येणाऱ्या गोष्टी प्राधान्य क्रमाने कराल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आपल्याकडून आदरातिथ्य सुद्धा चांगले होईल.

सिंह - इतरांसाठी जीव झिजवावा लागेल. काही गोष्टी आपल्या चुका नसताना सुधाराव्या लागतील. मनस्ताप वाढवणाऱ्या गोष्टी घडतील. खर्चात सुद्धा वाढ होईल. काळजी घ्यावी.

कन्या - मैत्रीचे आहे बंद पक्के होतील. हिशोब ठेवून कामे कराल. अनेक लाभ आज मिळणार आहेत. स्नेहभोजनाचे योग येतील. आनंदी असा दिवस आहे.

तूळ - कामासाठी प्रवास घडतील. प्रवासातून पुढील नवीन कामे मिळतील. उत्साहाना भरते येईल. सहकारी आणि वरिष्ठ दोघांच्या मदतीने प्रगतीची पायवाट कराल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासना करावी. भाग्यदायक घटना घडणार आहेत. सोन्याच्या खरेदी मधून वृद्धी दिसून येत आहे. लांबचे प्रवासही घडतील गुरुपुष्यामृतासारखा शुभ योग उपासनासाठी सुद्धा आज फायद्याचा ठरेल.

धनु - अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागेल. येणारे सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मात्र धन योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

मकर- जोडीदाराबरोबर आयुष्याचे पुढील नियोजन कराल. दिवस मनासारख्या घटना घडवणार आहे. पण त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत ही आज करावी लागेल. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल.

कुंभ - आपलीच माणसे आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहेत अशी भावना होईल. ज्यांना आपले म्हटले तेच गुप्त शत्रूंसारखी कामे करतील. सावधगिरीने आजची महत्त्वाची कामे करावीत. असा सल्ला आहे.

मीन - दत्तगुरूंची उपासना करावी. आज गुरुपुष्यामृत योग. आपल्या राशीला सोन्याच्या वस्तू खरेदी करणे विशेष लाभदायक ठरणार आहे. उपासनेला दिवस उत्तम आहे. संतती सुवार्ता कानी येतील. काळजी नसावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT