horoscope  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Thursday Horoscope in marathi : आज काही राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. तर काहींना कोर्टाच्या कामात यश मिळणार.

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,१४ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,पतेती.

तिथी-षष्ठी २६|०८

रास-मीन ०९|०६ नं. मेष

नक्षत्र-रेवती

योग-शूल

करण-गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आपली स्वतंत्र विचाराचे आणि धाडसी अशी रास आहे. आपल्याला काही गोष्टींचे बंधन नको असते. पण आज मात्र बंधन योगाची शक्यता आहे. नको असलेल्या गोष्टीत अडकून पडाल.त्यामुळे मनोबल सुद्धा कमी राहील.

वृषभ- कोणत्या तरी गोष्टीवरून प्रेरणा घेऊन कामाला लागाल. शेजारी चांगले संबंध प्रस्थापित होतील. सून, जावाई आणि घरातल्या लोकांबरोबर खेळीमेळीच्या वातावरणात दिवस जाईल .

मिथुन - समाजाचे ऋण हे आपल्याला मानावेच लागते. समाजाशी काहीतरी वेगळे आज कार्य तुमच्याकडून घडेल. त्यामुळे तुमच्या मानसन्मानामध्ये भर पडेल. दिवस चांगला आहे.

कर्क - भावनिक अशी असणारी आपली रास. सर्व प्रकारचे नातेसंबंध जपण्यासाठी आज प्रयत्न कराल. कानावर चांगल्या बातम्या येतील. मन भरून पावेल. शिवाची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे.

सिंह- महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर केलेली बरी. रेंगाळलेल्या गोष्टी अजून रखडतील. घाई करून काही उपयोग होणार नाही. अचानक धनलाभाची मात्र शक्यता आहे.

कन्या - बौद्धिक गोष्टीमध्ये अग्रेसर रहाल. आपला सल्ला इतरांना पटेल, मान्य होईल.विचारांची देवाण-घेवाण चांगली असल्यामुळे आज व्यवसायामध्ये नव्याने गती प्राप्त होईल. कोर्टात यश मिळेल.

तूळ - तब्येत त्रास देईल. पण नव्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन पेटून उठाल. अडचणी, अडथळे आले तरी त्यावर मात कराल. आजोळी संबंध दृढ होतील.दिवस संमिश्र आहे.

वृश्चिक- दहा व्यक्तींची काम एकटेच करण्याची ताकद आपल्या राशीमध्ये आहे. आज नव्याने एखाद्या गोष्टीची सुरुवात करणार असाल तर दिवस आपल्यासाठी चांगली फलित देणारा आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गती आणि प्रगती आहे.

धनु - तब्येतीकडे विशेष लक्ष द्याल. व्यायाम,शरीरसंस्था जपणे त्याचबरोबर जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतित करण्यासाठी आज आवडेल. प्रेमवीरांसाठी पैसे खर्च करण्याचा आजचा दिवस आहे.

मकर - प्रवासामध्ये त्रास होतील. पण प्रवास चांगला होईल. जवळचे प्रवास घडतील. त्यामधून पुढील गोष्टींविषयी चा फायदा नक्की होणार आहे.कोणती गोष्ट आटोपती घेऊन चालणार नाही. हे लक्षात ठेवा.

कुंभ - सर्वांपासून अलिप्त असणारी अशी असणारी आपली खरी रास आहे. आज मात्र कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतीत कराल. महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा आणि विनिमय होईल. पुढील गोष्टीचे मोठे नियोजन होईल. दिवस चांगला आहे .

मीन - आज आपल्या साधेभोळे पण इतरांना भावेल. मनस्वी आयुष्य जगण्याचा आज जणू काही पण केला आहे असे वागाल. इतरांच्या विचारांची तमा न करता दिवस चांगला जाईल. सुख पेरत जाल आणि वाटेवर ते उगवत जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT