Horoscope saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल; ५ राशींच्या लोकांची भरभराट होणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. तर काहींना मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतील.

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,३जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष,दुर्गाष्टमी.

तिथी-अष्टमी १४|०७

रास-कन्या २७|१९ नं. तुला

नक्षत्र-हस्त

योग-परिघ

करण-बवकरण

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - उष्णतेचे विकार, तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. आहार वेळेवर आणि नियंत्रित ठेवा. पित्ताचा त्रास कमी होईल. कामात व्यस्त रहाल. दिवस संमिश्र आहे.

वृषभ - प्रेमामध्ये विशेष समजूतदारपणा राहील. दोघांचे संबंध अधिक दृढ आणि आनंदी होतील. नवनवीन कल्पनांनी भरलेला दिवस असेल. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल. आज दुर्गाष्टमी आहे चांगले फळ मिळेल.

मिथुन - शेती बागायती मध्ये रस घेऊन काम कराल. नवनवीन संकल्पना अमलात आणणार आहात. करिअरमध्ये कुटुंबीयांच्या सहकार्याने एक वेगळ्या प्रकारची उंची गाठाल. देवाने दिले आहे कर्माने मोठे करा.

कर्क - जिद्द, चिकाटी, प्रेरणा या गोष्टीने आज आपल्या दिवसाचा अंमल घेतला आहे. याच पद्धतीने वागाल. विशेष करून लेखक, प्रकाशक, प्रिंटर इ. यांना आजचा दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे.

सिंह - जसे वागाल तसे कमवाल. असा आजचा दिवस आहे. उदारता पूर्ण भाव राहतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. कदाचित कुटुंबीयांची मोठी जबाबदारी आज तुम्हाला उचलावी लागेल. पण दिवसाच्या शेवटी सर्व छान होईल.

कन्या - बौद्धिकता ओसंडून वाहील. आपल्या आजूबाजूच्या लोकांवर विशेष प्रभाव राहील. सकारात्मकतेने भारलेला आजचा दिवस आहे. ठरवाल ते करावेच लागेल.

तुळ - "प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी" आज यामध्ये अडचण येईल असं दिसतंय.कदाचित प्रेमाच्या बाबतीत थोडे वाद वाढतील. कामांमध्ये व्यस्तता, व्यग्रता असणार आहे. मनोबल डळमळीत राहील.

वृश्चिक - नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन भाषा मोठे प्रवास, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन परिचय होतील. दिवस चांगला आहे.

धनु - मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल. कामानिमित्त प्रवास होतील. सहकार्यांना आणि वरिष्ठांना एकाच वेळी समजून घेण्याचा आजचा दिवस आहे. बढतीचे योग दिसत आहे.

मकर - शिव उपासनेने सर्व सिद्ध होईल. दानधर्मामध्ये दिवस व्यतीत करावा लागेल. मनःशांतीसाठी विविध अनुष्ठान करावी लागतील. भाग्यकारक वार्ता कानी येतील.

कुंभ - अचानक धनलाभ, मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून विशेष धनालाभाचे योग आहेत. कामांमध्ये मात्र खडतर परिस्थिती येईल. पाय जमिनीवर ठेवून कामे करावी लागतील.

मीन - कामांमध्ये काही दिवस अडचणी येत आहेत. व्यवसाय, व्यापारामध्ये हवी तशी प्रगती होत नाही. या सर्व गोष्टी आज थोड्याशा हलक्या होतील. व्यवसायामध्ये नव्या परिचयाने वृद्धी होण्याचा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: तिकीट विचारल्याने राग अनावर, प्रवाशाकडून टीसीला मारहाण; सरकारी मालमत्तेची तोडफोड, पाहा VIDEO

Raksha Bandhan Beauty : घरच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीनं करा फेशियल, चेहरा चमकेल क्षणात

Ruchak Rajyog: दिवाळीपूर्वी मंगळामुळे बनणार खास राजयोग; 'या' ३ राशींच्या घरी येणार पैसाच पैसा

Cyber Crime : मोबाइल हॅक करून सैनिकाला आठ लाखांचा चुना; ऑनलाईन कर्ज मंजूर करून घेत काढली रक्कम

Sion To Ahmadnagar Fort: सायन किल्ल्याहून अहमदनगर किल्ल्यापर्यंत कसे जाल? वाचा प्रवास करण्याचे बेस्ट ट्रॅव्हल टिप्स

SCROLL FOR NEXT