Conjunction Of Shani And Budh saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog: 18 मे पासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बुध-शनी बनवणार पॉवरफुल योग

Shani Budh Ardhakendra Yog 2025: बुध आणि शनि या ग्रहांना ज्योतिष्य शास्त्रामध्ये वेगळं महत्त्व आहे. या दोन्ही ग्रहांमुळे येत्या काळात एक राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. न्यायाचा देव शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. जो विशिष्ट कालावधीनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. 30 वर्षांनंतर शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे. याशिवाय ग्रहांचा राजकुमार बुध विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, १८ मे रोजी संध्याकाळी ५:१४ वाजता, बुध आणि शनि एकमेकांपासून ४५ अंशांवर असणा, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. यावेळी काही राशींना त्यांच्या क्षेत्रात यश मिळणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाचा अर्ध-केंद्र योग फायदेशीर ठरू शकणार आहे.यावेळी आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. सुख मिळू शकतं. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकणार आहे. पदोन्नतीसोबतच पगारवाढीचीही शक्यता आहे. व्यवसायातही चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मालमत्ता खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

कर्क रास

बुध-शनीचा अर्धकेंद्र राज योग या राशीच्या लोकांसाठीही भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना खूप चांगले फायदे मिळू शकतात. अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. घरातील वातावरण चांगले राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT