Shani-Mangal Yuti  Saam Tv
राशिभविष्य

Mangal-Shani Yuti: 5 एप्रिलपासून 'या' 3 राशींची होणार बल्ले-बल्ले; शनी-मंगळाची युती करणार मालामाल

ज्योतिषानुसार, मंगळाचं शौर्य आणि शनीची संयमशीलता यांचा मेळ एक सकारात्मक कालखंड आणणार आहे. ५ एप्रिलपासून निर्माण होणारा मंगळ-शनिचा लाभदायक संयोग सर्व राशींवर प्रभाव टाकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शनिवारी ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:३१ वाजता मंगळ आणि शनि एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. ज्योतिषशास्त्रानुसार, या कोनीय स्थितीत दोन ग्रहांची उपस्थिती शुभ मानली जाते. ग्रहांच्या या खगोलीय स्थितीला 'लाभ योग' म्हटलं जातं. दरम्यान या योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती त्याचं आयुष्य राजासारखं जगू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे धैर्य आणि शनीचा संयम यांचं संयोजन एक चांगला काळ घेऊन येणार आहे. ५ एप्रिलपासून तयार होणारा मंगळ आणि शनीचा फायदेशीर योग सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत ज्या या योगामुळे गडगंज श्रीमंत बनणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीची ही युती खूप शुभ राहणार आहे. मंगळ त्यांना ऊर्जा आणि आत्मविश्वास देणार आहे. तर शनीमुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. या काळात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा स्वतंत्र व्यावसायिक काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे.

वृषभ रास

करिअर आणि आर्थिक दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. मंगळ आणि शनीच्या फायदेशीर युतीमुळे त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. या काळात पैशाच्या बाबतीत सुधारणा होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल.

सिंह रास

सिंह राशीसाठी, हा काळ आर्थिक बाबतीत यश आणि प्रगतीचा असणार आहे. मंगळ आणि शनीची युती त्यांना त्यांच्या कामात सातत्यपूर्ण यश देणार आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकणार आहे. जुनी प्रलंबित कामं पूर्ण करता येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT