Surya Nakshatra Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Sun transit: जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्य करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु, प्रत्येक कामात मिळेल यश

Surya In Magha Nakshatra 2025: जन्माष्टमीचा (Janmashtami) पवित्र सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्योतिषीय घटना घडणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आपलं नक्षत्र बदलणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. या दिवशी सूर्य देव मघा नक्षत्रात प्रवेश करतील. मघा नक्षत्रावर केतु ग्रहाचे अधिपत्य असल्यामुळे सूर्य देवांचा हा प्रवेश सर्व राशींवर परिणाम करणार आहे.

यावेळी 3 राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकणार आहे. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. यावेळी देश विदेश प्रवास घडणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशींसाठी सूर्य देवांचा नक्षत्र परिवर्तनाचा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत. विवाहितांच्या दांपत्य जीवनात आनंद वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात पदोन्नती किंवा प्रगती होईल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य देवांचा हा नक्षत्र प्रवेश शुभ फलदायी ठरेल. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कमाईसाठी नवे स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या निमित्ताने लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकणार आहेत.

धनु रास

धनु राशींसाठी सूर्य देवांचा नक्षत्र बदल लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक किंवा मंगलकार्यांत सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंध चांगले राहतील आणि मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. शुभवार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्यात वाढ दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT