Venus And Sun Yuti saam tv
राशिभविष्य

Venus And Sun Yuti: जानेवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना होणार धनलाभ

Shukraditya Rajyog astrology January: ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्यात शुक्र आणि सूर्य यांचा संयोग होऊन शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींना यामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात यश मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा धन, वैभव, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचा घटक मानला जातो. अशाचवेळी सूर्यदेवांना आत्मविश्वास, आदर, प्रतिष्ठा, सरकारी क्षेत्र, प्रशासन आणि पितृत्व यांचं प्रतीक मानण्यात येतो. जेव्हा हे दोन प्रभावशाली ग्रह एकत्र येतात, तेव्हा शुक्रादित्य राजयोग तयार होतो.

शुक्रादित्य राजयोग हा अत्यंत शुभ परिणाम देणारा मानला जातो. यावेळी सूर्य आणि शुक्र दोघेही मकर राशीत गोचर करतील. या राजयोगाचा प्रभाव अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. या राजयोगामुळे कोणच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडणार आहेत ते पाहूयात.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा शुक्रादित्य राज योग दुसऱ्या घरात तयार होणार आहे. आहेया काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकणार आहे. ही वेळ फायदेशीर करार चांगला करवून देणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग ११ व्या भावात तयार होणार आहे. या काळात तुमच्या दीर्घकालीन इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. नोकरी बदलणं किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यताही आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक दृष्टीने हा काळ चांगला असणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हा शुभ योग चौथ्या घरात तयार होणार आहे. यावेळी तुम्ही नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवनात शांतता आणि सौहार्द वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत जागा बदलण्याची किंवा कामाचे चांगले वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT