Mangal Vakri 2024 saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri 2024: मंगळ ग्रहाच्या वक्री चालीने सुरु होणार अडथळ्यांची शर्यत; 'या' राशींचं प्रत्येक क्षेत्रात होणार नुकसान

Mangal Vakri 2024: मंगळ ग्रह तब्बल दोन वर्षांनी वक्री चाल चालतो. पंचांगानुसार मंगळ 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5:01 वाजता वक्री होणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळी गोचर करतात. राशी बदलाप्रमाणे काही ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. काही ग्रहांच्या वक्री आणि मार्गी गतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर देखील दिसून येणार आहे. मंगळ ग्रह तब्बल दोन वर्षांनी वक्री चाल चालतो. पंचांगानुसार मंगळ 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5:01 वाजता वक्री होणार आहे.

मंगळाच्या वक्री चालीचा 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. परंतु अशा काही राशी अशा आहेत ज्यांना काही प्रमाणात समस्येला सामोरं जावं लागणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना मंगळाच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनावर नकारात्मक विचारांचे वर्चस्व राहणार आहे. विवाहित लोकांचं सासरच्यांसोबत भांडण होऊ शकतं. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हे दिवस अनुकूल नसणार आहेत. नोकरदार लोकांनी यावेळी कोणालाही कर्ज देऊ नये. चुकीच्या खर्चामुळे विवाहित लोक आपल्या जोडीदाराशी भांडण करू शकतात. एखाद्या कोर्टाच्या प्रकरणात तुम्ही सापडू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India : भारतात सर्वप्रथम कुठे येतो सूर्यप्रकाश? अनुभवा निसर्गाचा चमत्कार

Beed News : तुम्ही डुक्कर मारायचं काम मन लावून करा; भीमराव धोंडे यांचा सुरेश धसांना अजब सल्ला

Maharashtra News Live Updates: मीरा भाईंदरमध्ये योगी आदित्यनाथ यांची भव्य सभा

Rohit Sharma vs Pat Cummins: रोहित शर्मा की पॅट कमिन्स, कुणाचं घर सर्वात महागडं?

Rashmi Shukla: रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेसची पक्की फिल्डिंग; पुन्हा सेवेत नको, उच्च न्यायालयात याचिका दाखल, का आहे विरोध?

SCROLL FOR NEXT