Budh Nakshatra Parivartan saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 30 ऑगस्टपासून 'या' राशीचं नशीब पालटणार; बुध करणार सूर्याच्या राशीत प्रवेश, प्रत्येक कामातून मिळणार पैसा

Budh Gochar 2025: ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध (Mercury) हा बुद्धी, व्यापार आणि संपत्तीचा कारक आहे. सध्या कर्क राशीत असलेला बुध ३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजून ३९ मिनिटांनी सूर्य ग्रहाच्या सिंह राशीत (Leo) प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, व्यापाराचा कारक ग्रह बुध ३० ऑगस्ट रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याची रास असलेल्या सिंह राशीत बुध प्रवेश केल्याने काही ना काही परिणाम होऊ शकणार आहेत. मित्र ग्रहाच्या राशीत प्रवेश केल्यामुळे तीन राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

बुधाचा सिंह राशीत प्रवेश

वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ३० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत सिंह राशीतच राहणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी असलेला बुध सिंह राशीत प्रवेश करून चौथ्या भावात राहणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अडलेली कामx पुन्हा सुरू होणार आहेत.

कर्क रास

या राशीच्या तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी बुध, दुसऱ्या भावात बसणार आहे. यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कपडे, दागिने किंवा इतर लक्झरी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकणार आहे. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. मेहनतीचे फळ मिळेल आणि जीवनात आनंदाचे क्षण येतील.

तूळ रास

या राशीच्या नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी बुध सिंह राशीत प्रवेश करून लाभभावात बसणार आहे. यामुळे खूप दिवसांपासून थांबलेली कामं पुन्हा सुरू होणार आहे. व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्मृतीने अखेर लग्नावर मौन सोडलं, मोठा निर्णय घेतला; पलाशचीही त्याच वेळी पोस्ट.. वाचा कोण काय म्हणाले

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

मोठी बातमी! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT