Budhaditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरला चमकणार 'या' राशींचं नशीब; 1 वर्षाने होणार बुध-सूर्याची युती

Sun and Mercury Conjunction 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या स्थितीचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. जेव्हा दोन महत्त्वाचे ग्रह एकत्र येतात, तेव्हा अनेक शुभ योग तयार होतात. असाच एक अत्यंत शुभ योग म्हणजे बुधादित्य योग.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांच्या युतींना अत्यंत मंगलकारी मानली जाते. जर अशा युती कुणाच्या जन्मकुंडलीत घडल्या तर त्या व्यक्तीचं जीवन समृद्ध होतं आणि त्याला वैभव, सुखसोयी मिळतात. यातीलच एक महत्त्वाची युती म्हणजे सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून घडणारी बुधादित्य राजयोगाची निर्मिती.

यंदा ही विशेष युती १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत घडणार आहे. या काळात तीन राशींच्या व्यक्तींचं भाग्य उजळणार आहे. उत्पन्नवाढ, पदोन्नतीचे योग तर आहेतच शिवाय संतती संबंधित शुभ वार्ताही मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशी लकी ठरणार आहेत ते पाहूयात.

धनु रास

सूर्य आणि बुध यांची युती करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होत असल्याने धनुराशीच्या व्यक्तींना या काळात मोठा लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः प्रगतीदायी ठरणार आहे. मेहनतीमुळे समाधान मिळणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ही युती दुसऱ्या भावात होणार आहे. यामुळे अचानक धनलाभाचे योग प्रबळ आहेत. नोकरीत बदल शोधणाऱ्यांसाठी किंवा उच्च पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा काळ फायद्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात तेज वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांची मदत मिळणार आहे.

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीच्या व्यक्तींकरिता सूर्य–बुध युती लाभभावात होत असल्याने उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. जुने गुंतवणुकीचे निर्णय आता फायदेशीर ठरणार आहेत. शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीमधूनही लाभ मिळण्याचे योग आहेत. रोजगार शोधणाऱ्यांना प्रामाणिकपणामुळे संधी प्राप्त होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT