shani margi saam tv
राशिभविष्य

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून या राशींचं नशीब चमकणार; शनीदेव मार्गी होऊन मिळवून देणार भरपूर पैसा

Saturn direct motion wealth increase: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे न्यायाधीश आणि कर्मफळ दाता शनिदेव हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात. शनिदेव जेव्हा शुभ स्थितीत येतात, तेव्हा ते त्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ देतात.

Surabhi Jayashree Jagdish

कर्मफल दाता शनि नवग्रहांमध्ये सर्वात कठोर पण न्यायप्रिय ग्रह मानला जातो. शनि आपल्या स्वभावानुसार प्रत्येक जातकाला त्याच्या कर्मांप्रमाणे फळ देतो. त्यामुळे शनीच्या चालीत होणारा कोणताही बदल प्रत्येक राशींवर परिणाम करतो. अडीच वर्ष शनिदेव गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत आहेत. हा संयोग स्वतःमध्ये दुर्मिळ आणि अत्यंत प्रभावशाली मानला जातो.

शनि जून 2027 पर्यंत मीन राशीत भ्रमण करणार आहे. या संपूर्ण काळात शनीच्या चालीत वेळोवेळी बदल होत राहणार आहेत. आता 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:20 वाजता शनि मीन राशीत मार्गी होणार आहेत. यामुळे काही राशींना चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या जातकांसाठी शनि मार्गी होणं अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. शनि तुमच्या राशीपासून तृतीय भावात सरळ चालणार आहे. यामुळे जीवनात आनंदाचे आगमन, अडकलेल्या कामांत प्रगती आणि उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामांत केलेली मेहनत आता फळ देईल.

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीच्या कुंडलीतील लग्नभावात शनि मार्गी होणार आहे. या राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनि मार्गी झाल्याने काही क्षेत्रांत चांगला लाभ मिळू शकणार आहे. करिअरमध्ये अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. शनि मार्गी झाल्यानंतर उत्पन्न सुधारण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या कुंडलीत शनि नवम भावात विराजमान असून त्याचठिकाणी मार्गी होणार आहे. आता शनि मार्गी झाल्यावर कर्क राशीच्या जातकांना पुन्हा प्रगती, स्थैर्य आणि यशाचा मार्ग दिसेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल. विवाहयोग्य जातकांसाठी अडथळे दूर होणार आहेत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, रिक्षा चालकाला मारहाण अन् दमदाटी

Maharashtra Live News Update: पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी

मोठी बातमी! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय ?

Anant Garje: अनैतिक संबंध, मोबाइलवर चॅटिंग; समजूत काढूनही तीच चूक; बायकोच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेंवर गंभीर आरोप

Vande Bharat Express : नागपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT