Surya Gochar saam tv
राशिभविष्य

Surya Gochar: 17 ऑगस्टपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; सूर्याच्या गोचरमुळे धन-संपत्तीमध्ये होणार भरमसाठ वाढ

Surya Transit In Leo 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत असतात, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यात आपली रास बदलतो. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना नवग्रहांचा राजा मानलं जातं. प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणजेच दर ३० दिवसांनी सूर्याचे गोचर होतं. ऑगस्ट महिन्यात सूर्यदेव तब्बल एक वर्षानंतर त्यांच्या स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करत आहेत. याला स्वराशी प्रवेश म्हणतात.

सूर्याचं हा गोचर काही विशिष्ट राशींना अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. काही लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळू शकणार आहे. यावेळी काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल तर काहींच्या जीवनात सौख्य आणि आर्थिक स्थैर्य येणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीसाठी हे गोचर फारच विशेष आणि शुभ ठरणार आहे. तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमचं स्थान अधिक भक्कम होणार आहे. ज्या तरुणांना काही नवीन सुरू करायचं आहे, त्यांना घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळू शकणार आहे. तुमच्या कल्पना आणि प्रयत्नांना प्रोत्साहन मिळणार आहे. विवाहित लोकांचं वैवाहिक आयुष्य आनंददायक होईल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचा गोचर अतिशय फलदायी ठरू शकणार आहे. कारण सूर्य आता तुमच्या गोचर कुंडलीच्या नवम भावात प्रवास करणार आहेत. कामधंद्याच्या दृष्टीने प्रवासाचे योग येणार आहेत. या प्रवासातूनच काही फायदेशीर संधी निर्माण होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याचेही योग आहेत.

कर्क रास

कर्क राशीसाठीही सूर्यदेवाचं गोचर सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यात प्रगल्भता आणि आत्मविश्वास येणार आहे. इतर लोक तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतील आणि त्यावर विश्वास ठेवतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला हळूहळू स्थैर्य मिळणार आहे. या काळात तरुणांना करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पाकिस्तानला चकवा देणाऱ्या ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन

Makeup Tips: तुम्हालाही मेकअप कराता येत नाही? मग फॉलो करा या सोप्या स्टेप्स आणि करा ग्लॅमरस मेकअप

Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडीत तब्बल ९,९०० महिला पदांची मोठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

Mumbai Crime : विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक; मुंबई पोलिसांचं 'ऑपरेशन क्लीन-अप' यशस्वी, टोळी अशी अडकली जाळ्यात

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदीत पूजा? नव्या वादाला सुरुवात? Video

SCROLL FOR NEXT