Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

Shukra Gochar in Leo: येत्या १५ सप्टेंबर रोजी सौंदर्य, सुख-समृद्धी आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह शुक्र तब्बल १ वर्षानंतर सूर्याच्या घरात प्रवेश करणार आहे. या महत्त्वपूर्ण ग्रह बदलामुळे काही राशींसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रात धन, वैभव, वैवाहिक आनंद, ऐश्वर्य, भोगविलास आणि भौतिक सुखाचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्र जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा या सर्व गोष्टींवर थेट परिणाम दिसून येतो.

सध्या शुक्र ग्रह कर्क राशीत भ्रमण करतोय आणि १५ सप्टेंबर रोजी तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे काही राशींवर विशेष कृपा होणार असून त्यांना नोकरीत बढती, अचानक धनलाभ आणि जीवनात प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुले होणार आहे. चला तर पाहूया शुक्राच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा गोचर अतिशय शुभ मानला जातो. कारण या काळात शुक्र ग्रह तुमच्या आय आणि लाभ भावात प्रवेश करणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि संततीकडून काही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला या काळात उत्तम संधी मिळणार आहे. घरगुती अडचणींवर उपाय सापडणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे राशी परिवर्तन सुखसमृद्धी घेऊन येणार आहे. कारण हे गोचर तुमच्या चतुर्थ भावात होणार आहे. नवीन घर, वाहन खरेदीची शक्यता निर्माण होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळणार आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय लाभदायी राहणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या कर्म भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे कामात प्रगती होणार आहे. नोकरीत कार्यरत असलेल्या लोकांना नवे मान-सन्मान, बढती आणि जबाबदाऱ्या मिळू शकणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची संधी आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT