Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Zodiac Signs: ग्रहांच्या गोचरदरम्यान अनेकदा एका राशीत दोन ग्रहांची युती होते. सोमवारी सूर्य आणि गुरु एकमेकांच्या एका विशिष्ट कोनात स्थित असणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थिती बदलान शुभ-अशुभ योग तयार होत असतात. ग्रहांच्या गोचरदरम्यान अनेकदा एका राशीत दोन ग्रहांची युती होते. ही युती काही वेळा लाभदायक असते तर काही वेळा ती धोकादायक देखील ठरू शकते. असंच या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आणि गुरू यांचा एक घातक संयोग निर्माण होणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, सोमवारी 11 नोव्हेंबर 2024 पासून 16:35 वाजता सूर्य आणि गुरु एकमेकांच्या एका विशिष्ट कोनात स्थित असणार आहे. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होणार आहे. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह 150 अंशांवर असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो.

दरम्यान या योगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. या काळात कोणत्या राशीच्या व्यक्तींना सतर्क राहावं हे पाहूयात.

मेष रास

मेष राशीचे लोक जास्त चिडखोर असू शकतात. आर्थिक नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमची प्रत्येक गोष्ट पैशावर अवलंबून राहू शकते. पचनास त्रास होऊ शक्यता आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचे लोक जास्त संशयी आणि चिंतेत राहू शकतात. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावू शकता. मित्रांसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांचं यावेळी गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकणार आहे. पदोन्नतीमध्ये विलंब होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित वादांवरून भांडणं होऊ शकतात. यावेळी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एकटेपणाचा अनुभव येऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गद्दार न केलेल्या कामाचा गवगवा करतात - उद्धव ठाकरे

Maharashtra Election : विरारमध्ये पैशांचा पाऊस; काल ७ कोटी आज २ कोटी जप्त

Garlic pickle: घरच्या घरी तयार करा लसणाचे स्वादिष्ट लोणचे

Milk Rice Benefits: दूध भात खाण्याचे फायदे काय?

ICC Cricket: पाकिस्तानच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती, 'या' ६ फलंदाजाला खातेही उघडता आले नाही, कोणत्या संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम?

SCROLL FOR NEXT