Laxmi Narayan Raj Yog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Rajyog: फेब्रुवारीपासून सुरु होणार या राशींचे 'अच्छे दिन'; शनीच्या राशीत बनणार लक्ष्मी नारायण राजयोग

Lakshmi Narayana Rajyoga February: ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात शनी राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि संपत्ती, यश व सुखसमृद्धी देणारा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्यात अनेक दुर्मिळ आणि शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. याचे परिणाम मानवी जीवनावर, देश आणि जगावर दिसून येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात धनाचा कर्ता शुक्र आणि व्यवसायाचा कर्ता बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे.

हा राजयोग शनीच्या राशीत तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी तुम्हाला उत्पन्नात वाढ होण्यासोबतच नवीन नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडणार आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनात आदर आणि तुमच्या कारकिर्दीत यश निश्चित होणार आहे. या काळात कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही खूप संयमी आणि सहनशील असाल.

वृश्चिक रास

लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती वृश्चिक राशीसाठी शुभ ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानात असणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयींचा अनुभव येणार आहे. तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. या काळात तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता देखील मिळू शकणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा देखील मिळू शकतो.

मिथुन रास

लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या भाग्य क्षेत्रात घडणार आहे. या काळात भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुकिंग रद्द केल्याचा राग? वडाळा परिसरात Urban Company थेरपिस्टकडून हाणामारीचा दावा

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

Akola Politics : अकोला महापालिकेत हायव्होल्टेज राजकारण; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, ४ पक्ष एकत्र

SCROLL FOR NEXT