Weekly Horoscope saam tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक समस्या सुटतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

weekly horoscope financial problems: ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात काही राशींवर ग्रहांची विशेष कृपा होणार आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या सुटतील आणि जीवनात स्थैर्य येईल.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

भाग्य स्थानात होणारी अमावस्या नवीन संधी उपलब्ध करून देणारी असून, भाग्योदयकारक घटना घडतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. मात्र, उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होतील.

वृषभ

अचानक मोठा लाभ होईल. वारसा हक्काच्या कामात यश मिळेल. छोटे प्रवास, यात्रा, सहली होतील. उत्तरार्धात नोकरी-व्यवसायात मोठे निर्णय घेणे अवघड राहील. वरिष्ठांशी गैरसमज टाळावेत.

मिथुन

तरुणांचे विवाह जमतील. मात्र, जोडीदारांशी मतभेद संभवतात. कोर्टकचेरीचे निर्णय अनुकूल लागतील. भागीदारीच्या नवीन व्यवसायाची संधी मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क

तरुणांना नवीन नोकरी मिळेल. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात जोडीदारांशी रुसवे-फुगवे संभवतात.

सिंह

शेअर मार्केटमध्ये नफा-नुकसान अनुभवास येतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. हितशत्रूचा उपद्रव जाणवेल. आरोग्य नरमगरम राहील जोडीदाराशी समज-गैरसमज संभवतात.

कन्या

सामाजिक-राजकीय क्षेत्रात मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत मोठे यश मिळेल. नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

तूळ

स्पर्धा-निवडणुकांमध्ये यश मिळेल. शत्रूवर विजय मिळेल. खेळ-कलेमधून प्रसिद्धी, पुरस्कार मिळतील. छोटे प्रवास होतील. भावंडे-नातेवाइकांचा सहवास लाभेल.

वृश्चिक

आर्थिक समस्या सुटतील. कर्जाची कामे होतील. मोठी गुंतवणूक होईल. घर-प्रॉपर्टीपासून लाभ होतील. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. महत्त्वाच्या कागदपत्रांस विलंब लागेल.

धनू

खेळ-कला क्षेत्रात यश मिळेल. निवडणुकांत विजय मिळेल. वर्चस्व वाढेल. नोकरीत अधिकार मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. उत्तरार्धात आर्थिक व्यवहार जपून करावेत.

मकर

व्यय स्थानातील अमावस्या मोठे खर्च करणारी राहील. मोठे कर्ज मंजूर होईल. परदेशगमनासाठी योग्य संधी मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक-मानसिक त्रास संभवतो.

कुंभ

लाभस्थानी होणारी अमावस्या मोठी इच्छा पूर्ण करणारी असून, मनासारख्या घटना घडतील. प्रेमप्रकरणात होकार मिळेल. उत्तरार्धात मोठे प्रवास होतील. प्रवासात किमती वस्तूंची काळजी घ्यावी.

मीन

सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. निवडणुकीत विजय मिळेल. मोठे पद-प्रतिष्ठा मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची कामे रखडतील

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT