Shani Budh Yuti  Saam Tv
राशिभविष्य

Shani-Budh Yuti: 'या' राशींचा वाईट काळ अखेर संपणार; शनी-बुध मिळवून देणार गाडी, बंगला आणि पैसा

Conjunction Of Shani And Budh: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव आणि बुद्धी, व्यवसाय व वाणीचा कारक बुध यांची येत्या काळात युती होणार आहे. या युतीमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. कारण या वर्षाच्या सुरुवातीला शनी आणि बुध यांची युती होणार आहे. या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अच्छे दिन येणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार ते पाहूयात.

न्यायाचा प्रतीक शनि आणि व्यापाराचा कारक बुध यांची पुढच्या वर्षी युती होणार आहे. विशेष म्हणजे ही युती मीन राशीत सुमारे ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा होणार आहे. या ग्रह संयोगामुळे काही राशींना अपार धन, पद-प्रतिष्ठा आणि मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींना शनी-बुध युतीचा अत्यंत सकारात्मक परिणाम जाणवणार आहे. ही युती त्यांच्या लग्न भावात होत असल्याने तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. सामाजिक स्तरावरही तुमची ओळख वाढेल. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन आनंददायक राहणार आहे. तर अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकणार आहे.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी ही युती लाभ स्थानात होत असल्यामुळे आर्थिक लाभाचे प्रबळ संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होणार आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीमधूनही लाभ मिळू शकणार आहे. कुटुंब आणि समाजात तुमची ओळख अधिक दृढ होणार आहे. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होणार आहेत.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या व्यक्तींना शनी-बुध युतीचा अनुकूल परिणाम मिळू शकणार आहे. ही युती त्यांच्या राशीपासून दुसऱ्या भावात होत असल्यामुळे नवीन लोकांशी संपर्क वाढू शकणार आहे. यश आणि धैर्य यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking : घराजवळ खेळत होते, पाय घसरला अन् कॅनॉलमध्ये पडले, २ चिमुकल्यांचा मृत्यू

Delhi car Blast Live updates : मृतांची संख्या १३ वर पोहोचली

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडचा फोटो समोर; नक्की कुणी कट रचला? साथीदार अन् भावांनाही अटक

Red Fort blast : दिल्लीमध्ये कारमध्ये ब्लास्ट, मृताची अन् जखमींची नावे समोर

Railway Rule: रेल्वेने मुलांना घेऊन जाताय? हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

SCROLL FOR NEXT