Samsaptak Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: सूर्य-शनीने तयार केला पॉवरफूल समसप्तक राजयोग; नव्या नोकरीसह 'या' राशींना होणार धनलाभ

Surabhi Kocharekar

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी या ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. ग्रहांच्या राशीतील बदलामुळे अनेक राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. सध्या ग्रहांचा राजा सूर्य स्वतःच्या राशीत असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे. याशिवाय सूर्याची दृष्टी शनीवर पडत असल्याने ते आमने-सामने येणार आहेत. यामुळे काही राशींना याचा लाभ होणार आहे.

दुसरीकडे मंगळ ग्रहाने ऑगस्ट महिन्यात राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश केला. 15 सप्टेंबरपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. सूर्य आणि गुरूसोबत मंगळाचा विशेष संयोग तयार होणार आहे. यामुळे समसप्तक योग तयार होतोय. या काळात काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. तर काही राशींच्या कुटुंबामधील वाद संपुष्टात येऊ शकतात.

मिथुन रास

या ग्रहांची युती मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या आता संपुष्टात येणार आहेत. कोर्टासंबंधी काही प्रकरणं असतील तर त्यापासून सुटका मिळू शकेल. घरातील वाद संपुष्टात येणार आहेत.

वृषभ रास

सूर्य आणि शनिमुळे तयार होणारा समसप्तक राजयोग या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. बिझनेसमध्ये असलेल्या समस्या दूर होऊ शकणार आहात. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला लाभ होणार आहे.

तूळ रास

सूर्य आणि शनि यांच्यामध्ये तयार होत असलेला समसप्तक राजयोग या राशींसाठी अनुकूल असणार आहे. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT