Surya Ketu yuti in Kanya Rashi saam tv
राशिभविष्य

Surya Ketu yuti: सूर्य-केतूची युती ठरणार डोकेदुखी; 'या' राशींच्या व्यक्तींवर संकटं ओढावण्याची शक्यता

Surya Ketu yuti in Kanya Rashi : दर महिन्याला कोणता ना कोणता ग्रह गोचर करतो. यामुळे एका राशीत ग्रहांची युती होते. असंच येत्या काळात सूर्य आणि केतूची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एकाच राशीमध्ये दोन ग्रह भ्रमण करतात. अशावेळी ग्रहांची युती निर्माण होते. शास्त्रानुसार, ही युती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. नुकतंच अशीच एक सूर्य-केतूची युती तयार झाली आहे.

ज्योतिष्य शास्त्रामध्ये सूर्य आणि केतूची युती फारशी चांगली मानली जात नाही. नुकतंच सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. मात्र यावेळी क्रूर ग्रह केतू त्या ठिकाणी उपस्थित आहे. यामुळे कन्या राशीमध्ये सूर्य आणि केतूचा धोकादायक संयोग तयार झाला आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येतोय. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

मिथुन रास

सूर्य आणि केतूची युती या राशींसाठी धोकादायक ठरणार आहे. हा काळ या राशींच्या व्यक्तींसाठी कठीण असणार आहे. नोकरी आणि व्यापारात तुमचं नुकसान होणार आहे. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

कन्या रास

या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबामध्ये संपत्तीवरून वाद होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका

कुंभ रास

केतूशी सूर्याची युती कुंभ राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च करण्यास भाग पाडणार आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. छोटा झालेला वाद मोठा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या नियमांत मोठा बदल! थेट शेतकऱ्यांच्या २१व्या हप्त्यावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: सोलापूरात जोरदार पाऊस; उळे - कासेगाव पूल पुन्हा गेला पाण्याखाली

Mobile Recharge Plan: ३० दिवसांची वैधता असलेला स्वस्त प्लॅन, स्वस्त डेटा आणि कॉलिंग प्लॅनची किंमत?

Dharashiv : धाराशिवला रेड अलर्ट जाहिर, शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Maharashtra Rains: पावसाचा हाहाकार, ४ जिल्ह्यात शाळांना सुट्टी, मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला, परिस्थिती पुन्हा भयानक

SCROLL FOR NEXT