Surya Ketu Yuti 2024 saam tv
राशिभविष्य

Surya Ketu Yuti: कन्या राशीत सूर्य-केतूची युती करणार मालामाल; 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Surya Ketu Yuti 2024: सूर्य देवाने 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी कन्या राशीमध्ये सूर्य केतूची युती झाली आहे. जाणून घेऊया या काळात कोणाला फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीमध्ये दोन ग्रह एकाच वेळी येतात. त्यावेळी ग्रहांची युती निर्माण होते. दोन ग्रहांच्या या युतीचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो.

अशीच एक युती सध्या कन्या राशीत झाली आहे. शास्त्रानुसार, सूर्य देवाने 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी कन्या राशीमध्ये केतू आधीपासून उपस्थित आहे. अशा स्थितीत सूर्य आणि केतूची युती निर्माण झाली आहे. सूर्य आणि केतूच्या संयोगाने काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशीचा समावेश आहे.

कन्या रास

केतू आणि सूर्याचा संयोग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. सर्वांशी तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. विवाहित लोकांचं जीवन सुंदर असणार आहे.

मकर रास

केतू आणि सूर्य युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकणार आहात. तसंच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. कर्जापासून मुक्ती मिळेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे.

वृश्चिक रास

केतू आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. तुम्ही भविष्याबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT