Sun Transit 2025 in Capricorn saam tv
राशिभविष्य

Surya Sankrman 2025: मकर संक्रातीला होणारं सूर्याचं संक्रमण ५ राशींसाठी ठरेल उत्तम, व्यवसायात नफा होणार दुप्पट

Sun Transit 2025 in Capricorn : मकर संक्रांतीवर यंदा पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग असून ज्योतिषशास्त्रानुसार हा योग आर्थिक समृद्धीसाठी शुभ असतो, अशी मान्यता आहे.

Bharat Jadhav

सूर्य १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीचा स्वामी शनी असून सूर्य आपल्या सुपुत्राच्या राशीत भ्रमण करतील. हे संक्रमण यंदा पुष्य नक्षत्रात होत आहे, त्यामुळे सुर्याच्या संक्रमणाचं महत्त्व वाढलेले आहे. मकर संक्रांतीपासून सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतील. सूर्याच्या या संक्रमणामुळे मेष आणि कन्या सह या राशींचे नशीब चमकणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच पैशांची भरभराट, , व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण म्हणजे वरदान ठरणार आहे. सुखसमृद्धीचे योग यावेळी आहेत. तर जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सरकारी दरबारी अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सिंह राशीवर प्रभाव

या राशीसाठीही सूर्याचे संक्रमण मोठे बदल घेऊन येणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील. कोर्टातील सुनावणीचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. या काळात जास्त उधार देऊ नका, अन्यथा आर्थिक तोटा होऊ शक्यता आहे.

कन्या राशी

सूर्याचे संक्रमण कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ ठरणार आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी मकर राशीत सूर्याचे संक्रमण भारी असणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. धर्म आणि अध्यात्माच्या गोष्टीत रुची वाढेल. परदेशात कामासाठी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. तुमचा अंहकारावर कंट्रोल ठेवा.

मकर राशीवर काय होणार प्रभाव

मकर राशीसाठी सूर्य संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. मान-सन्मानात वाढ होईल. मान्यवर तसेत तज्ज्ञ लोकांच्या भेटीमुळे कामात लवकर यश मिळेल. एकाच वेळी अनेक ठिकाणी नोकरीची संधी चालून येणार आहे. तुमचे उत्पन्न व्यवस्थीत वाढणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्याचे होऊ शकते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

SCROLL FOR NEXT