horoscope  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. तर काहींचे महत्वाचे कामे रखडण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,७ सप्टेंबर २०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,खग्रास चंद्रग्रहण,प्रोष्ठपदी पौर्णिमा.

तिथी-पौर्णिमा २३|३९

रास- कुंभ

नक्षत्र-शततारा

योग-सुकर्मा

करण-विष्टीकरण

दिनविशेष-ग्रहणदिन

मेष - रेंगाळली, रखडलेली कामे आहेत त्यातून लाभही होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास सुद्धा लाभेल.

वृषभ - तुमचे कार्यक्षेत्र वाढते राहणार आहे. एकूणच मान ,प्रतिष्ठा यामध्ये भर पडेल. समाजकारण आणि राजकारणामध्ये पुढाकार घेऊन कामे कराल.

मिथुन- दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. उत्साह आणि उमेद वाढती राहील. अध्यात्मिक प्रगती, लांबचे प्रवास, उपासना या दृष्टीने दिवस आजचा चांगला आहे

कर्क - कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा नकोच. वाहने मात्र जपून चालवावीत. असा दक्षतेचा इशारा आज आपल्या राशीला आहे. काळजी घ्यावी.

सिंह - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभणार आहे. जे कराल त्यामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या - उगाचच उठाठेवी आज नकोत. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. काही जणांचा कल आज मनोरंजनाकडे राहणार आहे. नोकरीमध्ये प्रगती होईल.

तूळ - संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. काही जणांचे वैचारिक परिवर्तन होईल. देवी उपासना आज आपल्याला फलदायी ठरेल. गुंतवणुकीसाठी दिवस छान.आवकजावकीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.

वृश्चिक - प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्नही मार्गी लागतील. सुखाच्या नव्या पाऊलवाटा तयार होतील. वाहन सौख्य उत्तम आहे.

धनु - काही काम धाडसाने आज पार पाडाल. द्विधा मनस्थिती मात्र टाळावी. नोकरीमध्ये समाधानकारक गती राहील. भावंड सौख्य उत्तम आहे.

मकर - व्यवसाय मध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आजचा दिवस आहे. दिवस व्यस्त राहील.

कुंभ - काही आरोग्याच्या जुन्या तक्रारी असतील तर आज त्या कमी होतील. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भारलेला आजचा दिवस आहे. नव्याने संकल्प हाती घ्याल.

मीन - कामाचा ताण आणि दगदग काही जणांना जाणवेल.खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढते राहील." अंथरूण बघून पाय पसरावे" असा काहीसा आजचा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर तुफान राडा; TMC-BJP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Video Viral

Maharashtra News Live Update: सिनेस्टाईल पाळत ठेवून 5 दरोडेखोर जेरबंद, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून; भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' हिट होताच रितेश देशमुखची चाहत्यांना विनंती; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला...

Pune Police: पुणे पोलिस दलात खळबळ, २ अधिकाऱ्यांना अटक, २९ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT