Budhaditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: सूर्य-बुधाच्या संयोगाने बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता

Budhaditya Rajyog: ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीमध्ये दोन ग्रहांची युती होते. येत्या काळात सूर्य आणि बुध ग्रहाची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार,प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीमध्ये दोन ग्रहांची युती होते. या युतीच्या माध्यमातून राजयोग तयार होतात. येत्या काळात असंच सूर्य आण बुधाच्या गोचरमुळे खास एक राजयोग तयार होणार आहे.

ग्रहांचा राजा सूर्य देव 16 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 23 सप्टेंबर रोजी व्यवसायाचा दाता बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फार लाभ होणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींच्या समावेश आहे.

सिंह रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढवण्यावर भर द्याल. व्यवसायात भरपूर नफा होणार असून तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. बिझनेसमध्ये चांगली कमाई झाल्यामुळे तुमचा नफा चांगला होणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो.

मकर रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. परिस्थिती योग्य असल्यास तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमच्या करियरमध्ये एक चांगली संधी तुम्हाला मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Puri Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट तयार करा चटपटीत दही पुरी रेसिपी

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

SCROLL FOR NEXT