Brahma Aditya Yog saam tv
राशिभविष्य

Brahma Aditya Yog : सूर्य, बुध आणि गुरु ग्रह बनवणार ब्रह्मा आदित्य योग; 3 राशींची होणार चांदीच चांदी

Sun Mercury and Jupiter Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व आहे. काल १५ जून २०२५ रोजी सूर्यदेव वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रहांचं गोचर फार महत्त्वाचं मानलं जातं. वैदिक कॅलेंडरनुसार १५ जून २०२५ रोजी सूर्य देव वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या ठिकाणी बुध आणि गुरू आधीच उपस्थित आहेत. यावेळी तीन मोठ्या ग्रहांचे एकत्र येणे एक विशेष योग निर्माण करत आहे, ज्याला ब्रह्म आदित्य योग म्हणतात.

ज्योतिषशास्त्रात, हा योग खूप शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. हा काळ काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशींना कामाच्या ठिकाणी मोठं यश मिळणार आहे. यावेळी व्यवसायात प्रगतीची शक्यता असणार आहे. जाणून घेऊया की या योगाचा कोणत्या राशींना मोठा फायदा होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. सूर्य, गुरु आणि बुध हे तिन्ही ग्रह तुमच्या राशीत एकत्र येणार आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. या काळात व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी प्रगती आणि लोकप्रियतेचा आहे.

सिंह रास

सिंह राशीसाठी त्रिग्रही योग लाभदायक असणार आहे. सूर्य हा तुमचा स्वामी ग्रह आहे. म्हणून सूर्याचं गोचर तुमचे विचार मजबूत करणार आहे. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय योजना सुरू करू शकता.

धनु रास

धनु राशीसाठी, सूर्य आणि गुरूचं मिलन एखाद्या वरदानापेक्षा कमी नसणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा अडकलेली कामं आता सहजपणे पूर्ण होऊ शकणार आहेत. सामाजिक जीवनात तुम्हाला चांगले आणि प्रभावशाली लोक भेटणार आहेत. तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT