Shani Surya Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Surya Yuti: यावर्षी सूर्य-शनीची २ वेळा होणार युती; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप, आर्थिक नुकसानही होणार

Shani Surya Yuti 2025: ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, हे वर्ष ग्रहांच्या संयोगांमुळे निर्माण झालेल्या आश्चर्यकारक देखील विशेष आहे. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते सूर्य आणि शनीच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, २०२५ हे वर्ष फार खास असणार आहे. याचं कारण म्हणजे या काळात अनेक त्यांच्या राशीत किंवा स्थितीत बदल करणार आहेत. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, हे वर्ष ग्रहांच्या संयोगांमुळे निर्माण झालेल्या आश्चर्यकारक देखील विशेष आहे. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते सूर्य आणि शनीच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, या वर्षी शनि आणि सूर्याची एकदा नाही तर दोन वेळा युती होणार आहे. याचाच अर्थ सूर्य आणि शनि दोनदा एकत्र येणार आहेत. तिन्ही राशीच्या लोकांसाठी शनी आणि सूर्याची ही युती चांगली नसणार आहे. या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकणार आहेत. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

मेष रास

या काळात पैशांचे व्यवहार करणं शक्यतो टाळावं. पैशाचे व्यवहार महागात पडू शकतात. नोकरदार लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकणार आहे. यासोबतच गुंतवणुकीतून आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पोट आणि डोळ्याशी संबंधित समस्या वाढू शकतात.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी शनी आणि सूर्याचा संयोग शुभ ठरणार नाही. या संयोगामुळे विवाहित लोकांच्या आयुष्यात अचानक काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसानासा सामोरं जावं लागू शकतं. आर्थिक अडचणींमुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याचा संयोग चांगले परिणाम देणार नाहीये. या काळात कुंभ राशीशी संबंधित लोकांना वडिलोपार्जित संपत्तीवरून वादाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. जमिनीवरून वाद वाढू शकतात. या काळात नवीन वाहन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करू नका. ऑनलाईन व्यवहारात तुमची फसवणूक होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

Sleep Health : वयानुसार किती तास झोप गरजेची आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: वाशिमच्या दुबळवेल जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी

SCROLL FOR NEXT