Shukra Nakshatra Gochar 
राशिभविष्य

Shukra Nakshatra Gochar: 2 सप्टेंबरपासून शुक्राचा 'या' राशींवर असणार विशेष आशीर्वाद; 'या' राशींवर बरसणार पावसासारखा पैसा

Shukra Nakshatra Gochar 2024: 2 सप्टेंबर रोजी हे नक्षत्र बदलून तो हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हस्त नक्षत्रात शुक्राच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होणार आहे, याची माहिती घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे ग्रह नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. प्रेम, सुख-समृद्धी, धन-वैभव, मान-सन्माना यांचा कारक शुक्र ग्रह मानला जातो. गोचरप्रमाणे शुक्र ठराविक काळानंतर नक्षत्र बदलतो.

सध्याच्या काळात शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आहे. मात्र 2 सप्टेंबर रोजी हे नक्षत्र बदलून तो हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राचा हा बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या परिणाम करण्याची शक्यता आहे. मात्र काही राशींवर याचा अधिक चांगला परिणाम दिसून येणार आहे. हस्त नक्षत्रात शुक्राच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना अधिक लाभ होणार आहे, याची माहिती घेऊया.

मकर रास (Makar Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हस्त नक्षत्रात शुक्राचं भ्रमण लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात नशीब पूर्ण साथ देणार आहे. करिअर क्षेत्रातही सकारात्मक प्रभाव पडण्याची शकता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर आता तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या काळात स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही भरपूर फायदा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

या राशीमध्ये शुक्र चढत्या घरात स्थित आहे. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल.

सिंह रास (Leo Zodiac)

हस्त नक्षत्रात शुक्र ग्रहाचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकणार आहे. या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत. यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल. तुमच्या अनेक इच्छा आता पूर्ण होऊ शकणार आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT