Mangal Gochar : तब्बल ९९ वर्षानंतर ३ ग्रहांचा अद्भुत योग; 'या' राशींच्या व्यक्तींच्या तिजोरीत भरणार पैसा

Mangal Gochar 2024: 26 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान गुरू, सूर्य आणि मंगळाचा असा खास योग तयार होणार आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे.
Mangal Gochar 2024
Mangal Gochar 2024
Published On

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत उपस्थित आहे. यासोबतच गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये आहे. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ 26 ऑगस्ट रोजी मिथुन राशीत प्रवेश करतोय. ग्रहांचं हे गोचर काही राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकणार आहे.

26 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान गुरू, सूर्य आणि मंगळाचा असा खास योग तयार होणार आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या संक्रमणामुळे कोणत्या राशी उजळल्या जाऊ शकतात.

मेष रास (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरु, मंगळ आणि सूर्याचे संक्रमण फायदेशीर ठरू शकणार आहे. मुळात हे तिन्ही ग्रह मित्र असल्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. तुम्हाला ज्या प्रदीर्घ समस्या असतील त्या आता संपुष्टात येणार आहेत. तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला बढती मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात.

मकर रास (Makar Zodiac)

या तिन्ही ग्रहांच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. यावेळी या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे. व्यवसायात कुठेतरी पैसे अडकले असतील तर ते आता परत मिळू शकतात. आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये अनेक नव्या आणि चांगल्या गोष्टी घडू शकतात

तूळ रास (Tula Zodiac)

या तिन्ही ग्रहांच्या गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवनातील समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी व्हाल. तुम्हाला अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. तसंच अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com