Shukra Grah  Astro Tare
राशिभविष्य

Shukraditya Rajyog: 2026 च्या सुरुवातीला बनणार शुक्रादित्य राजयोग; शुक्र-सूर्य या राशींना करणार करोडपती

Venus And Sun Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या युतीमुळे तयार होणारे राजयोग जीवनात मोठे यश, मान-सन्मान आणि अफाट धन-संपत्ती घेऊन येतात. २०२६ च्या सुरुवातीला असाच एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ योग तयार होत आहे

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. पुढच्या वर्षी अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. २०२६ च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या गोचरामुळे शुभ योग आणि राजयोग तयार होणार आहेत.

यावेळी ग्रहांचा राजा सूर्य आणि धनाचे दाता शुक्र यांची युती विशेष मानली जाते. या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. यावेळी काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रादित्य राजयोग उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल तसेच जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि वेतनवाढीची संधी मिळेल. जुन्या प्रकल्पांमध्ये यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे. मोठी व्यावसायिक डील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुक्रादित्य राजयोग धनभावात तयार होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि चांगला फायदा मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Retention 2026: आयपीएलमध्ये सर्व टीम्सची रिटेंशन लिस्ट जाहीर; पाहा कोणत्या टीममधून कोणता खेळाडू रिलीज?

Gold Rate Today : सोनं २४०० रूपयांनी झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेणार

Accident : महामार्गावर भयानक अपघात, अलिशान गाडीचा चक्काचूर, ५ जणांचा मृत्यू

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोरिवली पुढेही धावणार लोकल, एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका, काय आहे नेमका प्लॅन ? वाचा

SCROLL FOR NEXT