Shukraditya Rajyog saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog 2025: शुक्रादित्य राजयोग ३ राशींना करणार मालामाल; व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणार मदत

Shukraditya Yoga in horoscope: भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राजयोग तयार होणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा दोन महत्त्वाचे ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा 'राजयोग' तयार होतो, जो जीवनात मान-सन्मान, यश आणि धन-संपत्ती घेऊन येतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शुक्र या ग्रहांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सूर्याला ग्रहांचा राजा मानण्यात येतं. तर शुक्र हा प्रेम, ऐश्वर्य, विलासिता आणि सुख यांचा प्रतिनिधी आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. तो मेष राशीत उच्च आणि तूळ राशीत नीच मानला जातो. शुक्र वृषभ आणि तुला राशीचा स्वामी असून कन्या राशीत नीच आणि मीन राशीत उच्च मानला जातो.

सध्या सूर्य तूळ राशीत स्थित आहे. येत्या २ नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तूळ राशीत सूर्य आणि शुक्र यांची युती होईल आणि शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. हा योग १६ नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहणार असून काही राशींसाठी तो लाभदायक ठरणार आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. भौतिक सुख-सुविधा प्राप्त होणार आहेत. या काळात प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकणार आहे. सासरच्या मंडळींसोबत संबंध अधिक घट्ट होतील.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य-शुक्र युती आणि शुक्रादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. निवेशातून फायदा मिळणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. मोठ्या डील्स आणि करार मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. काम आणि व्यवसायात प्रगती होण्याची संधी चालून येणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार करता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Phaltan Female Doctor Case: महिला डॉक्टरवर बीडमध्ये अंत्यसंस्कार, आई-बापाचा काळीज चिरणारा आक्रोश | VIDEO

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

SCROLL FOR NEXT