Shukra Margi 2025 saam tv
राशिभविष्य

Shukra Margi: एप्रिलमध्ये 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा; यशासह मिळणार भरघोस संपत्ती

Shukra Margi 2025: शु्क्राच्या मार्गी चालीने ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना या काळात यश मिळू शकणार आहे. यावेळी काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या राशी किंवा नक्षत्र बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. यावेळी शुक्र ग्रह मार्गी आणि अस्त देखील होतो. त्यामुळे याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. येत्या काळात असंच शुक्र ग्रह मार्गी होणार आहे.

शुक्र हा एक अतिशय विशेष ग्रह असून तो संपत्ती, वैभव, समृद्धी, विलासिता यांचा कारक मानला जातो. एप्रिलमध्ये शुक्र ग्रह मार्गी होणार आहे. शु्क्राच्या मार्गी चालीने ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना या काळात यश मिळू शकणार आहे. यावेळी काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे, तर काहींचं आरोग्य सुधारणार आहे.

मिथुन रास

शुक्राची मार्गी हालचाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या उपजीविकेच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. तुमचं प्रेम जीवन देखील यावेळी चांगलं राहणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना यावेळी नवीन संधी मिळू शकतात.

कुंभ रास

धनदात्या शुक्राची थेट हालचाल कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून वाणीच्या स्थानावर जाईल. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमचं व्यक्तिमत्वही सुधारण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होणार आहेत.

कन्या रास

शुक्राची थेट हालचाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून थेट सातव्या घरात जाणार आहे. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असणार आहे. तुम्हाला विविध स्रोतांद्वारे संपत्ती मिळवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन बनला 'हा' सदस्य, चाहत्यांना धक्का

Maharashtra News Live Update : विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT