Shukra Gochar 2026 effects on Aries Cancer Leo Scorpio Sagittarius saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Shukra Gochar: शुक्राचे पुष्य नक्षत्रातील संक्रमण अनेक राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते. शुक्र ११ जून २०२६ रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल.

Bharat Jadhav

शुक्राचे नक्षत्र गोचर गुरुवारी ११ जून २०२६ रोजी दुपारी २:११ वाजता होईल. शुक्र २३ जून रोजी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुष्य नक्षत्रातील शुक्राच्या संक्रमणादरम्यान अनेक राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शुक्राच्या नक्षत्रातील बदल मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशींसाठी अशुभ ठरू शकतो. शुक्राच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशींना अतिरिक्त खर्च आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

मेष

मेष राशीला शुक्र संक्रमणाचे नकारात्मक परिणाम जाणवू शकतात. वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुमच्या बजेटमध्ये बिघाड झाल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला वैवाहिक तणावाचा अनुभव येऊ शकतो, त्यामुळे वादात पडणे टाळा.

कर्क

या राशीच्या लोकांसाठी काळ आव्हानात्मक असू शकतो. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळवणे कठीण आहे. तुम्हाला मालमत्तेत नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांना त्यांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणामाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह

तर सिंह राशीच्या जातकांसाठी वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. काही जण खर्च करण्यासाठी कर्जही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा खर्च आणखी वाढेल. या परिस्थितीमुळे अधिक अडचणी निर्माण होतील. ही परिस्थिती टाळण्यासाठी, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. प्रवासादरम्यानही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. व्यवसायांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण त्यांना मोठे नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करणे टाळावे.

धनु

या राशीच्या व्यक्तींसाठी गुंतवणूक करणे महाग ठरू शकते. तुम्हाला तोटा होऊ शकतो. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे खर्च वाढू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्हाला तणाव जाणवू शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समाज आक्रमक, जिल्हाभर काढण्यात येणार मोर्चा

SCROLL FOR NEXT