Today's Saturday Horoscope साम टीव्ही मराठी
राशिभविष्य

Saturday Horoscope : जन्माष्टमीला या 5 राशींचे नशीब चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने होणार धनलाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rashi Bhavisha : 12 राशींच्या आयुष्यात होणार चकत्कार. जन्माष्टमीच्या दिवशी भाग्य उजळणार.

Sakshi Sunil Jadhav

मेष : नोकरीत प्रगतीचे योग असून मान-सन्मान मिळू शकतो. कामाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळतील.

वृषभ : नोकरीत बदलासोबत पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायाची स्थिती सुधारेल आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : व्यवसायात सुधारणा होऊन लाभाच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो, त्यामुळे धावपळ वाढेल.

कर्क : नोकरीत बदल होऊन उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कुटुंबापासून दूर दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सिंह : व्यवसायात बदल होण्याची शक्यता असून नवीन ठिकाणी जाण्याचे योग आहेत. सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल, मात्र कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या : कला आणि संगीतामध्ये तुमची आवड वाढू शकते. घरात धार्मिक कार्यक्रमांवर खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायात बदलाची संधी असून उत्पन्नात वाढ होऊ शकते.

तुळ : व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाद-विवाद आणि विनाकारण राग टाळा, तसेच शत्रूंपासून सावध राहा.

वृश्चिक : नोकरीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सुधारणा होईल, मात्र शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात.

धनु : वैवाहिक जीवनात सुख-समाधान वाढण्याची शक्यता आहे. लेखन आणि बौद्धिक कामातून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि व्यवसायात सुधारणा होईल.

मकर : नोकरीसाठी ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. कामाचा विस्तार होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.

कुंभ : नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मीन: कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला कोण? श्रीकांत शिंदे अन् भाजपच्या २ आमदारांची नावं घेतली? शिंदेसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना काय सांगितलं?

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

SCROLL FOR NEXT