TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today: कोणाला मिळणार गुड न्यूज, कोणाला धनलाभ? पाहा सर्व १२ राशींचे आजचे भाग्य

today horoscop : आज कोणत्या राशीला धनलाभ होणार, कोणाला करिअरमध्ये यश मिळणार आणि कोणाला गुड न्यूज मिळणार? मेष ते मीन सर्व १२ राशींचे संपूर्ण भविष्य जाणून घ्या..

Namdeo Kumbhar

मेष (Aries)

आजचा दिवस सुख आणि कौतुंबिक आनंदाचा योग घेऊन आला असून नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे संकेत आहेत. मात्र, बोलण्यातील फटकळपणामुळे चांगले संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात जुन्या योजना गती घेतील आणि रखडलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहील. घशाचे किरकोळ त्रास टाळण्यासाठी थंड पदार्थांपासून दूर राहा.

वृषभ (Taurus)

तुमची बुद्धिमत्ता आणि संयमाच्या जोरावर आज अनेक दिवसांपासून रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अहंकार बाजूला ठेवा आणि विनाकारण होणारा खर्च टाळा. मार्केटिंग आणि सेल्स क्षेत्रातील लोकांना नवीन फायदेशीर प्रस्ताव मिळतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक ताजेतवाने वाटेल.

मिथुन (Gemini)

आज तुमची बुद्धी आणि बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल, तसेच परदेशाशी संबंधित कामांतून मोठा लाभ होईल. मौजमजा आणि फिरण्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने बजेटवर नियंत्रण ठेवा. मीडिया आणि संवाद क्षेत्रातील लोकांसाठी दिवस उत्तम असून बाहेरील संपर्कांकडून चांगली धनप्राप्ती होईल. डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे टाळा.

कर्क (Cancer)

तुमच्या नवीन कल्पना आज थेट आर्थिक फायद्यात बदलतील आणि नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील. अचानक झालेल्या बदलांमुळे विनाकारण विचलित होऊ नका आणि कोणाशीही बोलताना कडू शब्द टाळा. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस सर्वोत्तम राहील, मात्र सट्टा बाजारापासून दूर राहा. घशात खवखव किंवा खोकल्याचा त्रास संभवतो.

सिंह (Leo)

आज करिअरमध्ये मोठी प्रगती आणि यश मिळण्याचे योग असून नशीब तुमच्या मेहनतीला पूर्ण साथ देईल. मनात काही वेळा आत्मविश्वासाची कमी जाणवू शकते, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा आणि महिलांचा आदर करा. आंतरराष्ट्रीय क्लायंट किंवा मोठ्या प्रोजेक्टमधून आर्थिक लाभ होईल. संसर्ग (Infection) आणि ॲलर्जीपासून स्वतःचा बचाव करा.

कन्या (Virgo)

आज ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असून सरकारी कामातून मोठा लाभ होईल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. घाईघाईत वाहन चालवणे टाळा, कारण अपघात किंवा अचानक मोठे खर्च होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि अडकलेल्या फाईल्स पुढे सरकतील. पायऱ्यांवरून उतरताना किंवा चालताना घाई करू नका.

तुला (Libra)

कार्यक्षेत्रातील सकारात्मक बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि नशिबाच्या साथीमुळे तुम्ही स्पर्धांवर मात कराल. भागीदारीच्या किंवा पैशांच्या व्यवहारात अहंकार आणणे टाळा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. विमा किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक गुप्त लाभ मिळण्याचे योग आहेत. सतत एसीमध्ये बसणे टाळा, आज रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी जाणवू शकते.

वृश्चिक (Scorpio)

नातेसंबंध आणि भागीदारीच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम यश घेऊन येईल, तसेच विवाहेच्छुकांच्या लग्नाची बोलणी पुढे सरकतील. जोडीदाराशी संवाद साधताना ईगो मध्ये आणू नका, जुन्या वादांमुळे मानसिक शांतता बिघडू शकते. फॅशन आणि कला क्षेत्रातील व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल. पोटाचे विकार टाळण्यासाठी जास्त तिखट खाणे टाळा.

धनु (Sagittarius)

आजचा दिवस जुन्या अडचणी, कायदेशीर कटकटी आणि अडथळे संपवून मोठा दिलासा देणारा ठरेल. काही वेळा मनात निराशा येऊ शकते, अशा वेळी घरातील जबाबदाऱ्या आणि आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. नोकरीतील जुना ताणतणाव संपेल आणि रखडलेली थकबाकी वसूल होईल. आरोग्यात मोठी सुधारणा झाल्याने उत्साह वाढेल.

मकर (Capricorn)

आज घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील, तसेच मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न होईल. पैशांच्या देवाणघेवाणीत काही चढ-उतार येऊ शकतात आणि विनोदात बोललेली गोष्ट कोणाला टोचू शकते. इच्छित ठिकाणी बदली किंवा पोस्टिंग मिळण्याची शक्यता असून मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी दिवस सुरक्षित आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

कुंभ (Aquarius)

रखडलेली किंवा विस्कळीत झालेली कामे आज पूर्वपदावर येतील आणि बँक लोन मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराच्या वागण्यात थोडा रुखेपणा जाणवू शकतो, संयम ठेवा. ऑफिस किंवा व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा मोलाचा सल्ला आर्थिक फायदा करून देईल. घरातील ज्येष्ठांच्या औषधोपचाराची काळजी घ्या.

मीन (Pisces)

आज मुलांच्या अडचणी, भावंडांमधील वाद किंवा न्यायालयीन खटले तुमच्या बाजूने सुटण्याची दाट शक्यता आहे. कोणाशीही संवाद साधताना तुमचा सूर तीव्र किंवा कडू असू नये याची दक्षता घ्या. कला, शिक्षण आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जमीन-जुमल्याशी संबंधित मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT