ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला न्यायदेवता मानलं जातं. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यामुळे शनीच्या राशी परिवर्तनाचा आणि वक्री-मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. २०२७ मध्ये शनी तब्बत १३८ दिवस वक्री अवस्थेत राहणार आहेत. त्यामुळे मेष, वृषभ, मीन, कन्या आणि मकर या पाच राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष काहीसं आव्हानात्मक ठरू शकते. या काळात आर्थिक अडचणी, कामातले अडथळे आणि मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता ज्योतिषीय गणनेत वर्तवण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया, शनीची वक्री चाल कधी सुरू होणार आणि कोणत्या राशींना सावध राहावे लागेल.
ज्योतिषीय माहितीनुसार, शनी ३ जून २०२७ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२७ रोजी शनी वक्री होतील. ही वक्री अवस्था २४ डिसेंबर २०२७ पर्यंत राहणार आहे. या काळात २० ऑक्टोबर २०२७ रोजी शनी पुन्हा काही काळासाठी मीन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२८ रोजी पुन्हा मेष राशीत प्रवेश करतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२७ मध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करताना अडथळे येऊ शकतात. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल.
मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होऊन दुसरा टप्पा सुरू होईल. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागू शकतो. उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात.
मीन राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहावे. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. व्यवसायात चढ-उतार जाणवू शकतात.
कन्या राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. रागाच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक वातावरणातही मतभेद होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मानसिक दबाव जाणवण्याची शक्यता आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे नियोजन करताना अडचणी येऊ शकतात.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.