saturn to enter jupiter nakshatra saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार नक्षत्रामध्ये गोचर; 'या' राशींचं नशीब चमकणार, कमाईही तगडी होणार

Shani Nakshatra Gochar 2025: न्यायाची देवता म्हणजेच शनी देव सध्या उत्तराभाद्रप नक्षत्रात विराजमान आहे. जून महिन्यात हे नक्षत्र दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे या तिन राशींना भरपूर फायदे मिळू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह राशीप्रमाणे त्यांच्या नक्षत्रात देखील बदल करणार आहे. न्यायदेवता असलेल्या शनीनेही आपल्या मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश केल्यानंतर नक्षत्र बदललं आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७:५२ वाजता उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. याशिवाय २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे.

७ जून रोजी शनी उत्तराभाद्रपदाच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. उत्तरभाद्रपद नक्षत्राचा स्वामी शनी आहे. या नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनीच्या प्रवेशामुळे या तिन्ही राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे या काळात तुम्हाला धनलाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना यश मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात शनी जाणं फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीखाली जन्मलेल्या लोकांचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असू शकतात. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत. तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगणार आहात.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी उत्तरभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. त्याचप्रमाणे प्रेम असल्यास प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.संयमाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं.

तूळ रास

शनि उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. शत्रूंचा पराभव होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. जर तुम्ही आळस सोडला तर तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT