Shadashtak Yog saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: शनि-केतुमुळे तयार होणार्‍या षडाष्टक योगाने 'या' राशींना मिळणार महालाभ; आर्थिक संकट-आयुष्यातील अडचणी होणार दूर

Shadashtak Yog 2025: शनि-केतू षडाष्टक योग तयार करतायत. ज्यावेळी अशुभ ग्रह अशुभ घरांमध्ये बसतात तेव्हा ते शुभ परिणाम देऊ लागतात. त्यामुळे ज्योतिषांच्या मते शनि आणि केतूचा हा संयोग खूप फलदायी असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करतायत. यावेळी केतू सध्या कन्या राशीत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, न्यायाधीश शनी आणि केतू यांची स्थिती सहाव्या आणि आठव्या घरात एकमेकांपासून तयार होतेय. यामुळे शनि-केतू षडाष्टक योग तयार करतायत. ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार, ज्यावेळी अशुभ ग्रह अशुभ घरांमध्ये बसतात तेव्हा ते शुभ परिणाम देऊ लागतात. त्यामुळे ज्योतिषांच्या मते शनि आणि केतूचा हा संयोग खूप फलदायी असणार आहे.

ज्योतिषांच्या मते, शनि आणि केतूचा षडाष्टक योग व्यक्तीला आत्मनिर्भर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे लोकांची आर्थिक कोंडी लवकरच दूर होऊन त्यांच्या सर्व समस्या संपण्याची शक्यता आहे. या दोन ग्रहांच्या षडाष्टक योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असला तरी काही राशींसाठी हा योग लाभदायक असणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

या योगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा अनुभवायला मिळू शकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. हा योग आत्म-विश्लेषणाला प्रेरणा देणार आहे. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. आवेगांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळणार आहे. लोक जुने मतभेद दूर करणार आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून लोक अधिक जागरूक होणार आहेत. हे संयोजन त्यांना पैशांची बचत आणि नियोजित गुंतवणूक करण्यास मदत करणार आहे. आर्थिक लाभामुळे प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना सखोल अभ्यास, संशोधन आणि विश्लेषणात्मक कार्यात यश मिळणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास या योगाच्या प्रभावाने सुधारणा होणार आहे. लोक त्यांच्या जीवनशैलीत बदल करून निरोगी राहू शकतात. नवीन योजनांमध्ये यश मिळू शकणार आहे. लोक त्यांच्या निर्णयांमध्ये अधिक तर्कसंगत असतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT