Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Kendra Trikona Rajyog: केंद्र त्रिकोण राजयोगामुळे शनी ज्या राशींवर प्रसन्न होतो, त्या लोकांचे भाग्य पूर्णपणे बदलते, त्यांना त्यांच्या कर्माचे चांगले फळ मिळते आणि ते जीवनात मोठे यश प्राप्त करतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्यशास्त्रानुसार, सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. २२ तारखेला म्हणजेच शनिवारी शनि, चंद्र आणि गुरु यांच्या संयोगाने केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाला आहे. याशिवाय, ज्येष्ठा नक्षत्राच्या संयोगात सुकर्मा योगही तयार झाला होता.

ज्योतिष गणनेनुसार हा काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. या राशींना गुप्त स्रोतांमधून धनप्राप्ती होऊ शकणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष रास (Aries Zodiac)

हा योग मेष राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचा सहयोग मिळण्याची शक्यता आहे. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होणार आहे. आई-वडिलांसोबत प्रवासाची योजना आखली जाऊ शकते.

मिथुन रास (Gemini Zodiac)

एखाद्या कामात मिळालेल्या यशामुळे मन उत्साहित राहणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रेमसंबंधातील अंतर कमी होईल आणि वैवाहिक जीवनात मधुरता वाढणार आहे. विद्यार्थ्यांनाही या दिवशी महत्त्वपूर्ण यश मिळू शकणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

दीर्घ काळापासून अडकलेले एखादे मोठं काम पूर्ण होणार आहे. कुटुंबात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ लोकांशी संपर्क आल्याने भविष्यात नवीन संधी मिळू शकणार आहे. तुमच्या डोक्यावर जर कोणतं कर्ज असेल तर ते दूर होणार आहे.

धनु रास (Sagittarius Zodiac)

जीवनसाथीकडून तुम्हाला एखादे सरप्राइज मिळू शकणार आहे. सासरच्या मंडळींकडून लाभ आणि सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. धार्मिक कार्यांमध्ये मन गुंतणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या नवीन संधी मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Travel : इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' ठिकाण यादीमध्ये पाहिजेच

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

SCROLL FOR NEXT