शनिवार,२२ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष.
तिथी-द्वितीया १७|१२
रास-वृश्चिक १६|४७ नं. धनु
नक्षत्र-ज्येष्ठा
योग-सुकर्मा
करण-कौलव
दिनविशेष-१७ नं. चांगला
मेष
प्रवास आणि त्या निगडित होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आज आपल्याला झेलाव्या लागतील. वाहन चालवताना काळजी घ्या. घातपात अपघाताचे योग आहेत. धनलाभ मात्र चांगल्या प्रकारे होतील.
वृषभ
व्यवसाय, व्यापारामध्ये चांगली घोडदौड होईल. पैशाला खूप महत्त्व आहे हे आपल्या राशीला जास्त जाणवेल. त्या दृष्टीने नवीन संकल्प आणि उपक्रम आज हाती घ्याल. भागीदाराची योग्य साथ मिळाल्यामुळे सकारात्मकता वाढेल.
मिथुन
मामाचे विशेष प्रेम आज लाभेल. मात्र तब्येतीसाठी आपल्याला आज रेड सिग्नल आहे. विनाकारण कटकटी वाढतील. शत्रूंचा त्रास वाढेल मात्र या सगळ्यातून लीलया बाहेरही याल.
कर्क
आपल्या राशीला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे संतती आहे. सर्वांवर आपण प्रेम करता. आज संततीकडून खूप सुखद वार्ता येणार आहेत. प्रेमामध्ये सुद्धा यश मिळेल. दिवसांमध्ये चांगल्या घटना आणि घडामोडी घडणार आहेत. शिव उपासना करा.
सिंह
एखादी मोठी कुटुंबीयांची जबाबदारी आज तुम्हाला पेलावी लागेल. शेतीची कामे, जनावरांची क्रय विक्रय यामध्ये दिवस व्यस्त राहील. घरातील राजकारणी व्यक्तीच्या सहकार्याने पुढे जाल. दिवस चांगला आहे.
कन्या
लेखन क्षेत्रात वेगळी प्रगती होईल. बुद्धी आणि मन एकत्रित रित्या चालण्याचा आजचा दिवस आहे आणि ते कागदावर छान पद्धतीने उतरवाल. अनेक दिवस ज्या प्रकाशनाच्या गोष्टी उंबरठ्यावर असतील तर त्या दारी येतील हे लक्षात ठेवा.
तूळ
धनयोग चांगले आहेत. अर्थात लक्ष्मी ही चंचलच शोभते. त्यामुळे पैशाची आवक जावक चांगली होईल. खाण्यापिण्याची मौज असेल. मनाप्रमाणे घटना घडणाच्या आजचा दिवस आहे.
वृश्चिक
खूप ताकद आणि सहनशीलता असणारी आपली रास आहे. पण विनाकारण काही गोष्टी नकारात्मकही आपल्या मनात येतात. आज या सगळ्यांवर मात करून पुढे जाल. आपली मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी विविध प्रयत्न कराल आणि ते मिळवायलाही.
धनु
मनोबल कमी राहील.आपलीच व्यक्ती जेव्हा आपला घात करते तेव्हा खूप त्रास होतात. त्यात भरीस भर म्हणजे पैशाला हे अनेक वाटा मिळतील. हाती काही राहिले नाही अशी भावना येईल.पण अध्यात्माला धरून रहा. दिवस पार पाडाल.
मकर
सोयीच्या गोष्टी आज होतील. जवळच्या लोकांच्याकडून अपारस्नेह लाभेल. प्रियजनांबरोबर भोजनाचे योग येतील. जुने परिचय आणि गुंतवणूक दोन्हीमधून आज लाभ मिळणार आहेत.
कुंभ
जेवढे प्रयत्न कराल तितके यश मिळेल असा दिवस आहे. समाजकारण, राजकारणामध्ये आपले सन्मान वाढतील. पत वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने सकारात्मक वातावरण राहील.
मीन
देव भोळी असणारी आपली रास आहे. मात्र सहज देवदर्शनाचे योग आज येतील. आपल्या जवळच्या व्यक्तीकडून भागोदयकारक घटना घडणार आहेत. धनलाभ सुद्धा चांगले होतील. दिवस उत्तम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.