Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Saturday Horoscope In Marathi : काही राशींच्या लोकांच्या हातून धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य घडेल. तर काहींना धनलाभ होईल.

Anjali Potdar

पंचांग

शनिवार,१८ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,शनिप्रदोष,गुरु द्वादशी, धनत्रयोदशी.

तिथी-द्वादशी १२|२०

नक्षत्र-पूर्वा

रास-सिंह २२|१२ नं. कन्या

योग-ब्रह्मा

करण-तैतिल

दिनविशेष-१२ प. चांगला

मेष - आज शनि प्रदोष आहे. विशेष उपासना करणे आज फलदायी ठरेल. धनत्रयोदशीचा दिवस आपल्या शुभता घेऊन येईल आणि आयुष्यात येऊन धनवृद्धी करेल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ- प्रेमासाठी पैसा खर्च होईल. घरामध्ये नवीन काही गोष्टी खरेदी होईल. वाहन, घर घेणे यासाठी आजचा दिवस आपल्या राशीला विशेष लाभदायक आहे. शेतीच्या कामामधून भरभराट दिसून येत आहे.

मिथुन - भावंडसौख्य उत्तम राहील. कामानिमित्त जवळचे प्रवास होतील. कामाचा ताण असला आणि वाढला तरी सुद्धा सहजगत्या त्यातून मार्ग काढाल. जिद्द आणि चिकाटी कायम राहील.

कर्क - कुटुंबीयांचे सोपस्कार करण्यामध्ये दिवस व्यस्त राहील. सणासुदीचे दिवस आहेतच काही जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतील. खाण्यापिण्याची मांदियाळी राहील. दिवस चांगला आहे.

सिंह - एक वेगळ्या प्रकारची लहर आपल्या शरीरामध्ये आज जाणवेल. कामाला पेटून उठाल. आपला इतरांवर प्रभाव राहील. स्वतःचा आब जपण्यासाठी अनेक प्रयत्न कराल. दिवस चांगला आहे. आनंदी वाट्यास येईल.

कन्या - नको त्या गोष्टींचा आज विचार करून मानसिकता खराब करून घेऊ नये. मोठ्या प्रमाणात पैसा खरेदीसाठी खर्च होईल. मात्र त्याचबरोबर आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस याची काळजी घेणं आज गरजेचे आहे. मानसिकता सांभाळावी.

तूळ - मित्र-मैत्रिणींच्या गराड्यामध्ये राहाल. नव्याने ओळखी परिचय करण्यात एक वेगळी मजा येईल. सोचोटीने व्यवहार होतील. मात्र त्याचबरोबर तब्येतीची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

वृश्चिक - कर्मफल आपल्याबरोबर येते याची जाणीव ठेवावी. सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन नव्याने गोष्टी करण्याची लहर येईल. अनेक डगरीवर एकट्याने पाय ठेवाल . काहीतरी नव्या गोष्टी करण्याची ताकद आज तुमच्यात असेल. कार्यक्षेत्र वाढते राहील.

धनु - भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. धनत्रयोदशी आहे. पैशाच्या दृष्टीने भरभराट होईल. ज्या गोष्टी कराल त्यात यश मिळेल. देवधर्म आणि अध्यात्मात प्रगती होण्याचा दिवस आहे.

मकर - अचानक धनालाभ होतील. कामाशी निगडित व्यवहार होतील गुप्तधनासाठी दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. दिवसाच्या शेवट सुखकर होईल.

कुंभ - भागीदारी व्यवसायामध्ये काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे. नव्याने काहीतरी संशोधन होईल. कोर्टाच्या कामांमध्ये सहज यश मिळेल. दिवाळीच्या पूर्वाधात आनंद वार्ता कानावर येतील.

मीन - तब्येतीच्या तक्रारी वाढतील. काळजी घ्यावी. घरातील नोकर यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला आहे. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल. तरी सुद्धा नव्याने काही नियोजन करून दिवाळीमध्ये आनंद लुटण्याचा प्रयत्न कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

Maharashtra News Live Update: “नाव सेवाग्राम पण थांबा नाही”; खासदार अमर काळे यांच्याकडून खंत व्यक्त

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

काँग्रेसची मोठी कारवाई, ५ आमदार तडकाफडकी निलंबित; राजकीय वर्तुळात खळबळ

Pune : शौचालयाला जाणाऱ्या महिलेची काढली छेड, जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT