horoscope  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : वस्तू गहाळ होणार, व्यवसायामध्ये अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या वस्तू गहाळ होतील. तर काहींना व्यवसायामध्ये अडचणी येतील. वाचा शनिवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,२० सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,चतुर्दशी श्राध्द,शस्त्रादिहत पितृश्राध्द.

तिथी-चतुर्दशी २४|१७

रास- सिंह

नक्षत्र-मघा

योग-साध्य

करण-विष्टीकरण

दिनविशेष-चतुर्दशी वर्ज्य

मेष - आर्थिक क्षेत्रामध्ये मोठे धाडस करायला आज हरकत नाही. महत्त्वाच्या बैठक आणि गाठीभेटी आज पार पडतील. गणेश उपासना विशेष पलदायी ठरणार आहे. शेअर्समधील व्यवहार नक्की करा.

वृषभ - कामानिमित्त प्रवास होणार आहे. दैनंदिन कामे मार्गे लागतील. सर्व सुखे दारामध्ये घेऊन आलेला असाच जवळ आजचा दिवस आहे. जीवनाची मजा लुटाल.

मिथुन - विश्वासाने भारलेला आजचा दिवस आहे. त्यानिमित्ताने जिद्दीने एखादे काम करण्यासाठी पेटाल. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.

कर्क - तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. व्यवसायामध्ये अडचणी आली तरी त्याच बरोबर वृद्धी सुद्धा आहे. कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे अश्वस्त रहाल.

सिंह - आपली मतं याविषयी ठाम असणारी आपली रास आहे. आज त्याविषयी आग्रही पण राहणार आहात. एकूणच आरोग्याच्या तक्रारी कमी राहतील आणि सकारात्मक भूमिका बजावाल.

कन्या - गोंधळेपणा आज टाळणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणार तर नाहीत ना! याची काळजी घ्या. मनाची द्विधा अवस्था टाळून कामे करा.महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.

तूळ - वैश्य प्रवृत्तीची असणारी आपली रास व्यापारामध्ये फायदा होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आपल्या जवळच्या लोकांचा अर्थात प्रियजनांच्या सहवासाने आज दिवस आनंदी राहील.

वृश्चिक - सामाजिक क्षेत्रामध्ये हिरीरीने भाग घ्याल. तुमचे जे कार्यक्षेत्र असते त्याचा आवाका आज व्यापक राहणार आहे. राजकारणामध्ये यश मिळण्याचा दिवसही आहे.

धनु - अनेक दिवस वाट पाहत असणारी एखादी भाग्यकारक घटना आज घडणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवे संकल्प नव्या काही गोष्टी करून त्यामध्ये विशेष यश आज मिळणार आहे.

मकर - मिळालेल्या पैशाला अनेक वाटा असतात हे लक्षात घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते राहणारे आहे. शासकीय कामे पुढे जाण्याची शक्यता आहे. मनाने नाही तर बुद्धीने आज कामे करावे लागतील.

कुंभ - भागीदारी व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. एकूणच उत्साह आणि उमेद वाढविणाऱ्या घटना आज घडतील. कोर्टाच्या कामांमध्ये सुद्धा उत्तम यश मिळेल.

मीन - किती केले तरी त्याचे पूर्ण यश मिळणे अवघड आहे. वेळ आणि पैसाही वाया जाईल. उगाचच मानसिक उद्विग्नता जाणवेल. साधेपणा सोडून व्यवहार जपावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Thane Road Traffic : भिवंडी-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कांद्याचे दर कोसळले; नाफेडच्या कांदा वाहतुकीविरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक|VIDEO

Maharashtra voters : 7 महिन्यात वाढले 14 लाख मतदार, विधानसभेनंतर पुन्हा मोठी मतदारवाढ; काय परिणाम होणार?

Chhagan Bhujbal : 'जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवणार'; मराठा नेते छगन भुजबळांच्या टार्गेटवर, VIDEO

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची फिल्डिंग, महापालिकेसाठी ठाकरें बंधूंचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT