Samudrik Shastra, the ring finger or Sun finger reveals secrets of love, creativity and emotional strength. saam tv
राशिभविष्य

Samudrik Shastra: लांब, छोट्या, वाकड्या अनामिका बोटाचे संकेत काय? हृदयाशी काय आहे संबंध

Samudrik Shastra On Anamika Finger: सामुद्रिक शास्त्रात अनामिका बोटाला सूर्याचे बोट आणि प्रेमाचे, स्नेहाचे बोट म्हटले जाते. पण तुम्हाला माहितीये का लांब, लहान किंवा वाकड्या अनामिका बोट हे हृदय, व्यक्तिमत्व आणि सामाजिक ओळख याबद्दल संकेत देत असते.

Bharat Jadhav

  • अनामिका बोटाला सामुद्रिक शास्त्रात “सूर्य बोट” म्हणतात

  • लांब अनामिका बोट आत्मविश्वास आणि प्रेमळ स्वभाव दर्शवते

  • लहान अनामिका बोट संवेदनशीलता आणि अंतर्मुखता सूचित करते

सामुद्रिक शास्त्रात अनामिका बोटाला वेगळं महत्त्व देण्यात आलंय. अनामिका बोट हे रहस्य आणि श्रद्धेने व्यापलेली आहे. सामुद्रिक शास्त्र, ज्योतिष, योग आणि विज्ञान या सर्वांमध्ये या बोटाच्या महत्त्वाचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. या बोटाला "सूर्य बोट" असे म्हटलं जाते. अनामिका बोट एखाद्या व्यक्तीचे प्रेम, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक ओळखीचे संकेत देणारे असते. लांब, लहान, वाकड्या अनामिका बोटाचे काय संकेत आहेत, त्याचा हृदयाशी काय संबंध आहे आणि या बोटाचे इतर रहस्य काय आहेत? हे जाणून घेऊ.

अनामिका नावाचा अर्थ

संस्कृतमध्ये, अनामिका म्हणजे "नावाशिवाय" किंवा नाव नसलेला. प्राचीन मान्यतेनुसार हे बोट इतकी पवित्र मानली जाते. या बोटाला कोणत्याही सामान्य नावाशी जोडली जात नाही. म्हणूनच या बोटाचे नाव अनामिका पडले आहे. हिंदू धर्मात अनामिका बोटाला केवळ हाताचा एक भाग मानली जात नाही, तर ती व्यक्तिमत्त्व आणि जीवनाचे संकेत देणारं मानले जाते.

रोमन आणि इजिप्शियन संस्कृतींमध्ये अनामिका बोटातील एक रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. याला व्हेना अमोरिस असे म्हटलं जातं. या श्रद्धेमुळे या बोटात साखरपुडा आणि लग्नाच्या अंगठ्या घालण्याची परंपरा निर्माण झाली, याला "अनामिका" म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही जगभरात या बोटाला प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.

तर्जनीपेक्षा अनामिका बोट मोठे असले तर

हस्तरेषाशास्त्रात सूर्य पर्वत अनामिका बोटाच्या खाली स्थित आहे. हे पर्वत प्रसिद्धी, सन्मान, कला आणि आत्मविश्वास दर्शवते. ज्या लोकांचे अनामिका बोट तर्जनीपेक्षा लांब असते त्या लोकांमध्ये जोखीम घेण्याचे धाडस, सर्जनशील विचार आणि नेतृत्व क्षमता जास्त असते असे मानले जाते. असे लोक कला, माध्यम, फॅशन किंवा व्यवसायात प्रगती करत असतात.

मध्यम आकाराची अनामिका बोट संतुलित आणि व्यावहारिक व्यक्तिमत्व दर्शवते. लहान अनामिका बोट समाधानी स्वभाव आणि मर्यादित महत्त्वाकांक्षा दर्शवत असते. टोकदार अनामिका संगीत, लेखन आणि चित्रकला यासारख्या क्षेत्रांशी संबंध दर्शवत असते. चौकोनी टोक कलांद्वारे संपत्ती आणि ओळख दर्शवते.

योगामध्ये अनामिका बोट हे ऊर्जा संतुलनाशी संबंधित आहे. पूजेदरम्यान या बोटाने तिलक लावला जातो. असे मानले जाते की ते मानसिक एकाग्रता वाढवते आणि सौर घटक सक्रिय करते. या बोटाचे अनेक आध्यात्मिक पद्धतींचे कार्य केली जातात.

विज्ञान काय म्हणते?

वैज्ञानिकदृष्ट्या पाच बोटांपैकी अनामिका ही स्वतंत्रपणे हालचाल करणे सर्वात कठीण असते. त्याच्या नसा आणि स्नायू इतर बोटांपेक्षा जास्त जोडलेले असतात. हे सर्वात मऊ बोट मानले जात असते म्हणून डॉक्टर डोळ्यांभोवती क्रीम लावण्यासाठी या बोटाचा वापर करण्याचे सांगत असतात.

दोष आणि पारंपारिक उपाय

जर अनामिका वाकडी असेल किंवा त्यावर तीळ असेल तर ते सूर्याशी संबंधित कमकुवतपणा मानली जाते. पारंपारिकपणे दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

... तर जनता माफ करणार नाहीत ; महापालिका जिंकल्यानंतर CM फडणवीस असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: १९ तारखेला जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता दिवसभर राहणार बंद

Crime News: ५०० रुपयांसाठी मैत्री विसरला; मित्राला क्रूरपणे संपवलं, तरुणानं मृतदेह घरी पोहोचवला, नंतर...

Sunday Horoscope: येणारी संधी सोडू नका, या ५ राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार; वाचा रविवारचे खास राशीभविष्य

ठाकरे ठरणार किंगमेकर; महापालिकेवर सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसचाही दावा

SCROLL FOR NEXT