राशिभविष्य

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Panchang Today 15 July 2025: आज १५ जुलै २०२५, मंगळवारचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. पंचांगानुसार, आजचा दिवस विशिष्ट योग आणि नक्षत्रांच्या संयोगाने खास बनला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

१५ जुलै २०२५ हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी पहिला मंगळागौरी व्रत आहे. या दिवशी माता पार्वतीची विशेष पूजा केल्याने दारिद्र्य, संकटं आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, असं मानलं जातं.

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य टिकवण्यासाठी हा व्रत करतात, तर काही स्त्रिया योग्य वर मिळावा यासाठीही ही उपासना करतात. पाहूया या दिवशीचं पंचांग, शुभ-अशुभ संयोग बनवत आहेत आणि कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

१५ जुलै २०२५ – मराठी पंचांगानुसार दिनविशेष

  • वार- मंगळवार

  • तिथी- पंचमी (१४ जुलै रात्री ११:५९ पासून १५ जुलै रात्री १०:३८ पर्यंत)

  • नक्षत्र- शतभिषा

  • योग- सौभाग्य

  • सूर्योदय- सकाळी ५:२९

  • सूर्यास्त- संध्याकाळी ७:२३

  • चंद्रोदय- रात्री १०:२६

  • चंद्रास्त- सकाळी ९:४५

  • चंद्र राशी- कुंभ

  • पंचक- संपूर्ण दिवस

  • विडाल योग- सकाळी ६:२६ पासून पुढच्या दिवशी सकाळी ५:३४ पर्यंत

शुभ-अशुभ काळ

सकाळचे शुभ मुहूर्त

  • चर- सकाळी ९:०० – १०:४४

  • लाभ- सकाळी १०:४४ – दुपारी १२:२७

  • अमृत- दुपारी १२:२७ – २:१०

संध्याकाळचे शुभ मूहूर्त-

राहुकाल व अशुभ वेळा (शुभ कार्य टाळा):

  • राहुकाल- दुपारी ३:५४ – ५:३७

  • यमगंड काल- सकाळी ९:०० – १०:४४

  • गुलिक काल- दुपारी १२:२७ – २:१०

या राशींना मिळेल लाभ

वृश्चिक (Scorpio)

आज गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. एखाद्या इन्व्हेस्टरकडून लाभदायक डील होऊ शकते.

कन्या (Virgo)

आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्यातही सुधारणा होईल. जोखीम नसलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

या राशींनी घ्या विशेष काळजी

कर्क (Cancer)

कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात असंतुलन निर्माण होईल. मानसिक तणाव आरोग्यावर परिणाम करू शकतो.

मकर (Capricorn)

खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर उधारी घेण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक नियोजन नीट करा.

आजचा विशेष उपाय काय करावा?

मंगळागौरी व्रताच्या दिवशी माता पार्वतीला सौभाग्यसामग्री अर्पण करा. यामुळे वैवाहिक आयुष्यात सुख, समाधान आणि सौभाग्य टिकून राहतं. अविवाहित मुलींना सुयोग्य वर प्राप्तीची शक्यता वाढते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला ३ वर्षे होऊनही मूल होत नाही, नवरा बायकोला घेऊन मांत्रिकाकडे गेला; शेतात नेऊन केला बलात्कार

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांनी भरवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा

Meta कडून 1 कोटी Facebook अकाउंट ब्लॉक; यात तुमचा तर अकाउंट नाही ना? का केली कारवाई?

Ambenali Ghat Closed : आंबेनळी घाटातील वाहतुकीवर १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध, दरड कोसळण्याचा धोका

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT