Mahashivratri Rashifal Saam Tv
राशिभविष्य

Mahashivratri Rashifal: महाशिवरात्रीला शनि-रवि-शुक्र कुंभ राशीत असतील, या राशींचे भाग्य उजळेल

Rashifal Mahashivratri 2024: देशभरात ८ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या वर्षी शिवरात्री ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे अनेक शुभ योगायोग घडणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Rashifal Mahashivratri 2024: 

देशभरात ८ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या वर्षी शिवरात्री ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे अनेक शुभ योगायोग घडणार आहेत. त्यामुळे ही महाशिवरात्री खूप खास असणार आहे. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल आणि बुध मीन राशीत प्रवेश करेल. या वर्षीच्या महाशिवरात्रीला शनि, शुक्र आणि सूर्य यांचा संयोग कुंभ राशीत तर, राहू आणि बुध यांचा संयोग मीन राशीत तयार होईल.

मंगळ आणि चंद्र मकर राशीत राहिल्याने लक्ष्मी योग तयार होईल. त्याचबरोबर महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्ध योग, सर्वार्थ सिद्धी योगासह श्रावण नक्षत्र आणि धनिष्ठ नक्षत्र तयार होणार आहेत. शुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींना महाशिवरात्रीपासून महिनाभर लाभ होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचे शुभ योग आणि ग्रहांची चलबिचल लाभदायक ठरू शकते. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. काही लोक मालमत्ता खरेदी देखील करू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अनेक नवीन कामे मिळतील. किरकोळ अडचणींवर सहज मात कराल. अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. (Latest Marathi News)

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग आणि शुभ योग तयार होणे शुभ ठरू शकतात. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिकांना चांगली डील मिळू शकते. घरात सुख-शांती नांदेल. त्याचबरोबर तुमचं धार्मिक कार्यातही मन लागेल.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला ग्रहांची चलबिचल आणि शुभ योग तयार होऊ शकतात. जीवनातील अडचणी हळूहळू संपू लागतील. नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या संघर्षचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. पदोन्नतीचीही शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

SCROLL FOR NEXT