Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : मनासारखा पैसा मिळेल, काहींनी चुकीच्या लोकांपासून राहा सावध; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today In Marathi : आज काही राशींच्या लोकांना मनासारखा पैसा मिळेल. तर काहींनी व्यवसायातील भागीदाराबरोबर वाद विवाद टाळावेत. वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,१९ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी- चतुर्थी १०|०३

रास- कर्क २६|०० नं. सिंह

नक्षत्र- आश्लेषा

योग- वैधृति

करण- बालव

दिनविशेष-१९ नं. चांगला

मेष - जेवढे फिराल तेवढे प्रगतीचे आज योग आहेत. व्यवसायामध्ये स्वतःचे विचार ठाम ठेवून आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांबरोबर नवीन प्रस्ताव वाढीस ठेवल्यास भरपूर यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगतीची दिशा आहे.

वृषभ - सून जावयांकडून आदर मिळेल. मित्र-मैत्रिणींकडून योग्य सन्मान मिळाल्यामुळे दिवस सुखाचा जाईल. स्नेहभोजनाचे योग आहेत लाभ पदरात पडतील.

मिथुन- जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. हॉस्पिटलायझेशन दिसते आहे. मोठ्या प्रवासाचे योग आखले जातील आणि ते कार्यान्वित होतील.

कर्क - स्वतःच्या अस्तित्वाची आज विशेष जाणीव होईल. इतरांना तुम्ही हवेहवेसे वाटाल. नवीन खरेदी स्वतःसाठी कराल.कपडे, दागदागिने यामध्ये सुद्धा मन रमेल.

सिंह- खाण्यापिण्याची चंगळ राहील. सर्वांना बरोबर घेऊन चालाल. लक्ष्मी चंचल आहे याचा आज भास होईल. पण मनासारखा पैसा मिळेल.

कन्या - पराक्रमाला नवीन पंख फुटतील. जे कराल त्यात आज यश आहे. छोट्या प्रवासात फायदा होईल. संततीकडून आज लाभ दिसतो आहे.

तूळ- दुभती जनावरे यांच्या खरेदी विक्री यातून फायदा होईल. आईच्या तब्येतीची तक्रार वाढेल त्यासाठी विशेष लक्ष द्या. दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील.

वृश्चिक - गणेश उपासना फलदायी ठरणार आहे. संकष्टी सारखा योग आज आहे. शेअर्स मधील पैसा वाढता राहील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

धनु - तब्येतीच्या तक्रारी वाढतील. शत्रू त्रास देतील. जुन्या गोष्टी ज्या त्रासाच्या आहेत त्या नव्याने डोके वर काढतील. आपली मनस्थिती खंबीर ठेवून पुढे चालावे लागेल.

मकर - भागीदाराबरोबर उगाच वाद विवाद आज टाळा. कोर्टाच्या कामांमध्ये सुयशप्राप्ती आज होणार आहे. दिवसाचा आनंद वैवाहिक जोडीदाराबरोबर लुटाल.

कुंभ - पैशावरून आपल्यावर बालंट येईल. चुकीच्या लोकांपासून सावधगिरीचा इशारा आज आहे. काही वेळेला बुद्धीपेक्षा कृती योग्य ठरते. आज हाच सल्ला विचारात घ्या.

मीन- संकष्टी चतुर्थी सारखा उपासनेला उत्तम दिवस आहे. गणेश उपासनेतून अनेक मार्ग निघतील. दिवस भाग्यकारक ठरेल. यशासाठी आकाश ठेंगणे वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

SCROLL FOR NEXT