Daily Horoscope Today 29th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशींच्या जीवनात आज चांगल्या गोष्टी घडतील; इतरांकडून वाहवा मिळेल

Horoscope Today in Marathi : धनू राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम प्रणयासाठी आजचा दिवस अनुकूल संधी घेऊन आलेला आहे. चांगल्या गोष्टी घडतील, तुमच्या नशिबात काय? वाचा आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग दिनांक २९ जुलै २०२४

वार - सोमवार आषाढ कृष्णपक्ष. तिथी - नवमी. नक्षत्र - भरणी. योग - गंड. करण - गरज. रास - मेष. दिनविशेष - ११ पर्यंत का. चांगला दिवस.

मेष : रागावर नियंत्रण ठेवाल

रागावर नियंत्रण ठेवून दिवस आनंदाने घालवा. आपली सकारात्मकता वाढवा तर आरोग्य उत्तम राहील. पित्त व उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला जपा.

वृषभ : पैशाला अनेक वाटा फुटतील

विनाकारण पैसा खर्च होणार नाही ना याची काळजी घ्या. जेणेकरून पैशाला अनेक वाटा फुटतील. उसने पैसे आज कोणाला देऊ नका. मनस्ताप टाळा

मिथुन : चांगल्या गोष्टी घडतील

शेजाऱ्यांशी आज हितगुज कराल. एकमेकांच्या सहकार्याने काही चांगल्या गोष्टी सामाजिक कार्यात होतील. आपल्या कामाच्या जोडीला तरुणांचा सहवास मिळेल.

कर्क : सहकारी घेऊन श्रेय लाटतील

प्रसिद्धीची वाट आवडत असेल तरी ती सहज नाही. त्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात. असाच आजचा दिवस आहे. प्रवासाने त्रस्त होऊन जाल. काही वेळेला आपल्या साध्या स्वभावाचा फायदा आपले सहकारी घेऊन कामाचे श्रेय लाटतील.

सिंह : अनेकांचे आशीर्वाद मिळतील

दान व दानत वाढेल. योग्य अयोग्य यातला ताळमेळ आज साधाल. अनेकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे हाती घेतलेल्या गोष्टी विनासायास पार पडण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या : मनासारख्या गोष्टी होतील

कसेही केले तरी मानसिक ताण,त्रास जात नाहीत ही जाणीव होईल. मेहनतीने सगळ्या गोष्टी मिळतात असे नाही तर कधी बुद्धीची जोड कामाला द्या. मनासारख्या गोष्टी होतील.

तुळ : गोष्टी सहज शक्य होतील

नवीन वस्तूंची खरेदी होईल. जोडीदारासोबत दिवस आनंदी असेल. स्वप्नांना नवीन पंख फुटतील. अवघड गोष्टी सहज शक्य होतील.

वृश्चिक : आपला वट वाढवा

तब्येत जरा त्रास देईल. धावपळ वाढेल. नोकर चाकरांना आपल्याला नियंत्रणात ठेवावे लागेल. त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागेल. आपला वट वाढवा.

धनु : चांगल्या गोष्टी घडतील

प्रेम प्रणयासाठी आजचा दिवस अनुकूल संधी घेऊन आलेला आहे. चांगल्या गोष्टी घडतील. निर्णय योग्य ठरतील. उपासनेसाठी दिवस श्रेष्ठ आहे.

मकर : पाहुण्यांची ऊठबस होईल

वाहन सौख्य, ग्रह सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला. यामध्ये नवीन बदल किंवा खरेदी असेल तर ती योग्य ठरेल. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल.

कुंभ : इतरांकडून वाहवा मिळेल

विनासायास गोष्टी पार पडतील. मनातील इच्छाही पूर्ण होतील. आपल्यातली ताकत याचे आज प्रकटीकरण स्वतःलाच होईल. इतरांकडून वाहवा मिळेल.

मीन : गुंतवणुकीला दिवस चांगला दिवस

कुटुंबीयांबरोबर सुसंवाद साधाल. नवीन काही गोष्टी खरेदीसाठी चर्चा विनिमय होईल. गुंतवणुकीला दिवस चांगला दिवस. पण साक्षीसाठी नाही. काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT