Daily Horoscope Today 23th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशींच्या व्यक्तींची आज होणार भरभराट; पैशांची होणार बरसात

Horoscope Today 23th July 2024 : आज मंगळवार आषाढ कृष्णपक्ष. तिथी - प्रतिपदा. राशीचक्रानुसार आज काही राशींच्या लोकांना अनेक सुसंधी मिळतील. संपूर्ण गोष्टी मनासारख्या घडतील, वाचा तुमचे राशीभविष्य...

Satish Daud

आजचे पंचांग - मंगळवार दिनांक - २३ जुलै २०२४

आषाढ कृष्णपक्ष. तिथी-द्वितीया.नक्षत्र-धनिष्ठा. योग - आयुष्मान. करण - गरज. रास - मकर -९ : २० प. नंतर कुंभ. दिनविशेष - उत्तमदिवस.

मेष : कीर्ती आणि सन्मान वाढेल

आपल्या स्वभावातील धमक आणि ताकत दोन्हीही गोष्टी आज कामाच्या ठिकाणी दाखवा. आपली कीर्ती आणि सन्मान वाढण्याचे योग आहेत. बढती आणि बदली दोन्हीची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

वृषभ : नवीन कामे मिळतील

अनेक गोष्टींचा उपभोग घेण्याचा आजचा दिवस आहे. उपासना, तीर्थयात्रा यामधून समाधान मिळेल. प्रवास घडतील. प्रवासातून नवीन कामे मिळतील. कला, मनोरंजन यामध्ये मन रमेल.

मिथुन : पैसे मिळण्याचे योग

"बोलायचे तर चांगलेच बोलायचे" आज असे ठरवा. आपल्या बोलण्याचे द्विअर्थ होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराकडून पैसे मिळण्याचे योग आहेत. त्याचा योग्य विनियोग करा.

कर्क : मोठे प्रवास होतील

मोठे प्रवास होतील .परदेशगमनाचे नियोजन होईल. आपल्या नेहमीच्या हसतमुख सवयीने नातेवाईकांचे स्वागत करा. दिवस चांगला राहील.

सिंह : तब्येतीच्या तक्रारी वाढतील

आपली उदारता व दानत याचे काही वेळेला अनुमान लागत नाही. नको त्या लोकांचे हव्या त्या गोष्टी करण्यासाठी अनेकदा चूक होते. असे लोक वेळीच ओळखा. तब्येतीच्या तक्रारी वाढतील.

कन्या : सुखासाठी दिवस चांगला

संतती सुखासाठी दिवस चांगला आहे. प्रेमासाठी असुसलेपण आज जाणवेल. काही वेळेला मन आणि बुद्धी याच्या कौलामध्ये मनाचा विचार करावा लागतो. तो आजचा दिवस आहे. तूळ : नवीन वस्तू खरेदी कराल

तूळ : नवीन वस्तू खरेदी कराल

आयुष्य हे सुंदर जगण्यासाठी आहे हे आपल्या राशीला वेगळे सांगायला नको. आज असाच दिवस आहे. नवीन वाहन किंवा घरातील नवीन वस्तू खरेदीसाठी दिवस पर्वणी घेऊन आलेला आहे. आनंद हा पैशांमध्ये दडलेला नक्कीच असतो.

वृश्चिक : दिवस सुखाचा राहील

न बोलता काम करणे. दहा कामे एकत्र करणे हे आपल्याला लीलया जमते. म्हणूनच अनेक केलेल्या गोष्टी किंवा आज करण्यात येणाऱ्या गोष्टी दोन्हीमध्ये पराक्रम आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. दिवस सुखाचा राहील.

धनु : योग्य गुंतवणूक करा

द्विधा मनस्थिती आज टाळावी लागेल. श्रेयस आणि श्रेयस या दोघांमधली एक निवड करावी लागेल. पैशाशी निगडित योग्य गुंतवणूक करा आणि आलेल्या पैशाचा योग्य विनियोग सुद्धा करा.

मकर : आनंद शोधण्याचा प्रयत्न करा

विचारी आणि गंभीर असणारी आपली रास आहे. स्वतःकडे आज विशेष लक्ष द्या. आयुष्यातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आरोग्यदायी असा दिवस आजचा राहील.

कुंभ : आज खटपट राहील

नवीन काहीतरी गोष्टी करण्याची आज खटपट राहील. त्यासाठी भले कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल असा निश्चय असेल. मोठया प्रवासाचे बेत यशस्वी होतील.

मीन : मनाचा गोंधळ करू नका

शांती आणि समाधान शोधत असाल तर आज ते सहज मिळणार आहे अनेक गोष्टी मनासारखे घडतील. मात्र मनाचा गोंधळ करू नका. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT