Daily Horoscope Today 9th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२४ मंगळवारी तुमच्या नशिबात काय बदल घडणार? जाणून घ्या...

Horoscope Today 9th July 2024 : आजचे संपूर्ण राशीभविष्य आणि दैनिक पंचांग वार मंगळवार दिनांक ८ जुलै २०२४ राशीचक्रानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? जाणून घ्या...

Anjali Potdar

दैनिक पंचांग - दिनांक - ९जुलै २०२४

वार - मंगळवार आषाढ शुक्लपक्ष. तिथी - चतुर्थी. नक्षत्र - आश्लेषा रास - कर्क. योग - सिद्धि. करण - वणिज. दिनविशेष - चांगला दिवस

मेष : कामासाठी ऊर्जा चांगली राहील

खूपदा स्वभावातल्या उतावळेपणाला आपणच लगाम घालावा लागतो. आपल्या स्पष्ट बोलण्याने, तापटपणामुळे घरातले कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. मात्र कामासाठी ऊर्जा चांगली राहील. आई विषयी विशेष प्रेम वाटेल.

वृषभ : आजचा दिवशी प्रवास होईल

छोटे प्रवास घेऊन आजचा दिवस आलेला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत मुळातच सगळीकडे हिरवाई त्यामुळे एखाद्या छोट्या सहलीला भावंडासह, शेजाऱ्यांसह जाण्याचे आज योग आहेत. त्यामुळे कामातून सुट्टी घेऊन आज पर्यटन व निसर्गाच्या सानिध्याला जवळ कराल.

मिथुन : गुंतवणूक ही महत्त्वाची ठरेल

कोणी काही म्हटलं तरी आपण हसत आयुष्य जगता. आजचा दिवस थट्टामस्करीत जाईल. काही गुंतवणूक ही महत्त्वाची ठरेल. आज करार मदार होतील.

कर्क : व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल

प्रेमाने सगळ्यांना आपलेसे करणारी आपली रास. भावना आणि मन इतरांचे जपून आपले जपणारी रास. आज दिवस हा तुमच्यासाठी छान संधी घेऊन आलेला आहे आनंद द्विगुणित होईल. सकारात्मकता वाढेल. व्यक्तिमत्व आकर्षक दिसेल.

सिंह : विनाकारण खर्च अटळ आहे

आपल्याच तोऱ्यात जगणारी ही रास. आज मात्र काही केल्या मनाची उभारी वाटणार नाही. कामे होतील पण मन अस्वस्थ राहील. विनाकारण खर्च अटळ आहे हे लक्षात घ्या.

कन्या : दिवस चांगला जाईल

आधी मोठ्या केलेल्या गुंतवणुकीचे आज फलित मिळण्याचा दिवस आहे. मग ती गुंतवणूक पैशाची असो किंवा नात्यातील गुंतवणूक असो. तुम्हाला त्यातून लाभच लाभ मिळतील. दिवस चांगला जाईल.

तूळ : आपला ओरा वाढता राहील

श्रेयस आणि प्रेयस यातला निर्णय घेण्याचे काही क्षण असतात तोच आजचा दिवस आहे. करिअरला प्राधान्य देऊन आपल्या कामात राहा. आपला व्याप आणि ओरा वाढता राहील. यातच तुम्हाला समाधान लाभणार आहे. कामासाठी प्रवास घडतील.

वृश्चिक : उपासनेसाठी दिवस चांगला

काही वेळेला विंचवाचे घर पाठीवर अशी आपली अवस्था असते. इतरांचे करता करता स्वतःचे सर्वस्व सोडून देणारी अशी आपली रास आहे. पण याचाच आतून त्रास होतो. म्हणून आज अध्यात्मासाठी, स्वतःच्या उपासनेसाठी दिवस चांगला आहे ही संधी दवडू नका.

धनु : निधड्या छातीने सामोरे जा

आपली वृत्ती तशी "हम करें सो कायदा" अशी खूपदा असते. पण आज मनाने कितीही ठाम निर्णय घेतले तरी तसे घडेलच असे काही वाटत नाही. त्यामुळे आलेल्या गोष्टींना निधड्या छातीने सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे.

मकर : आपली गरज सगळीकडे लागणार

"कशासाठी पोटासाठी, कशासाठी प्रेमासाठी" अशी आजची आपली अवस्था आहे. काम आणि जोडीदार या दोन्ही गोष्टीला महत्त्व दिले जाईल. एकूणच आपली गरज सगळीकडे लागणार आहे. त्यामुळे कामाची ऊर्जा वाढवा.

कुंभ : चूक केली त्यालाच शिक्षा द्या

"चोर सोडून संन्यासाला अटक" अशी एक म्हण आहे. आज अशाच काही गोष्टी आपल्या जवळ घडतील. नक्की काय झाले आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे हे शोधून काढणे आपल्या हातात आहे. चूक केली त्यालाच शिक्षा द्या अन्यथा आपल्याला त्रास भोगावा लागेल.

मीन : आनंदी गोष्टींना सामावून घ्या

आयुष्यातला आनंद लुटण्यासाठी आपल्याला काही कारण लागत नाही. पण आज मात्र आनंद लुटण्याची अनेक कारणे आपल्याला मिळतील. संतती सुख, कलेतून आनंद, उपासनेतून शांतता, लॉटरी मधून धनयोग त्यामुळे या सगळ्या आनंदी गोष्टींना सामावून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

Maharashtra Politics: योगेश कदम का? मग नितेश राणे फेल झाले का? – विनायक राऊतांनी डिवचले|VIDEO

SCROLL FOR NEXT